जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एक भारतात आली, दुसरी पाकिस्तानात गेली! या 2 प्रेमवेड्या नेमक्या आहेत तरी कोण?

एक भारतात आली, दुसरी पाकिस्तानात गेली! या 2 प्रेमवेड्या नेमक्या आहेत तरी कोण?

एकामागून एक दोन लव्हस्टोरी घडल्या, तेही सोशल मीडियाच्याच माध्यमातून. कशा?

एकामागून एक दोन लव्हस्टोरी घडल्या, तेही सोशल मीडियाच्याच माध्यमातून. कशा?

या दोन्ही प्रकरणांमध्ये काही फरकदेखील आहेत, ते म्हणजे अंजू दोन वर्ष वाट पाहून कायदेशीर पद्धतीने व्हिसा मिळाल्यानंतर पाकिस्तानात गेली, तर सीमा ही अवैध पद्धतीने भारतात घुसली.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जुलै : एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवण्यासाठी भाजपा विरोधात महत्त्वाचे सर्व पक्ष एकवटले आहेत. दुसरीकडे राज्याच्या, देशाच्या विविध भागांमध्ये पावसाने झालेल्या नुकसानाच्या बातम्या समोर येत आहेत. तर अलीकडेच भारताने चांद्रयान 3 लाँच केल्याचीही जोरदार चर्चा आहे. मात्र या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये 2 सर्वसामान्य नावं संपूर्ण देशात प्रचंड गाजताहेत. ही नावं म्हणजे ‘सीमा’ आणि ‘अंजू’. लोकांना इतर सर्व विषयांपेक्षा या दोन महिलांविषयी जाणून घेण्यात विशेष रस आहे. सीमा हैदर नामक पाकिस्तानी महिला तिच्या 4 मुलांना घेऊन भारतात आली आणि तिचा प्रियकर सचिन मीणा याच्याशी लग्न करून नोएडात राहू लागली. तर, फेसबुकवरून मैत्री झाल्यावर प्रियकराला भेटण्यासाठी राजस्थानची अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात गेली. ही वर-वरची माहिती आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र आज आपण या दोन महिला नक्की कोण आहेत, हे मुद्देसूद जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

पाकिस्तानची ‘सीमा’ ओलांडून आली 4 मुलांची आई पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी असलेल्या सीमा हैदरच्या संसारात 4 मुलांचा किलबिलाट होता. तिचा नवरा गुलाम हैदर हा नोकरीसाठी सौदी अरेबियात राहायचा. 2020 साली म्हणजेच कोरोना काळात पबजी खेळता खेळता सीमा नोएडाचा रहिवासी असलेल्या सचिन मीणा याच्या प्रेमात पडली. दोघांनी एकमेकांना WhatsApp नंबर दिला. मग काय…चॅटिंग जोरदार सुरू झालं. त्यांच्या प्रेमाला इतकं उधाण आलं की, आता एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. मग सीमाने सचिनला पाकिस्तानात बोलवलं. परंतु त्याने मात्र यासाठी नकार दिला. मग मार्च महिन्यात ती स्वतः नेपाळमध्ये आली. तेथील हॉटेलमध्ये दोघं आठवडाभर एकत्र राहिले. तिथून सीमा पाकिस्तानात परत गेली. मात्र जूनमध्ये आपल्या 4 मुलांना घेऊन ती आधी शारजाहमध्ये नंतर काठमांडूमध्ये आली आणि नेपाळमार्गे भारतात घुसली. सीमानं रचला होता प्लॅन B, व्हिसामुळे उघड झाली मोठी माहिती दोघांनी नेपाळमध्ये लग्न केल्याचा दावा केला असून आता नोएडात संसार थाटला आहे. मात्र सीमा ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने भारतीय तपास यंत्रणेचं तिच्यावर बारीक लक्ष आहे. ती भारतात येताच तिच्यासह सचिन आणि सचिनच्या वडिलांना उत्तर प्रदेश एटीएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशी करून सोडून दिलं. मात्र सीमाकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आता पुन्हा एकदा एटीएस अधिकाऱ्यांनी तिची चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानात जाण्याचं धाडस करणारी 2 मुलांची आई अंजू सीमा हैदर प्रकरण ताजं असतानाच समोर आलं अंजूचं प्रेमप्रकरण. अंजू, वय वर्ष 35. मूळ उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातल्या कलोरची तरुणी. 2007 मध्ये तिचं लग्न अरविंदसोबत झालं. लग्नानंतर ती पतीसोबत राजस्थानच्या भिवाडी जिल्ह्यात राहू लागली. तिला अरविंदपासून दोन मुलं आहेत. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. फेसबुकच्या माध्यमातून ती पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या 29 वर्षीय नसरुल्लाहच्या संपर्कात आली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि चॅटिंगचं रूपांतर फोनवर बोलण्यात झालं. हळूहळू दोघांमध्ये व्हर्च्युअल प्रेम झालं. या प्रेमात अंजूला संसाराचा काय, तिच्या मुलांचाही विसर पडला. ती थेट प्रियकरासाठी पाकिस्तानला निघाली. प्रेमापोटी तिने व्हिसा मिळवून पाकिस्तान गाठलं. पाकिस्तानात जाताच तेथील पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. मात्र तिच्याकडे योग्य कागदपत्र मिळाल्यानंतर तिला सोडण्यात आलं. आता अंजू नसरुल्लाहच्या दीर बाला येथील घरात त्याच्यासोबत राहू लागली आहे. इतकंच नाही, तर तेथील पोलिसांनी तिला संरक्षणही दिलं आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, साखरपुडा झाल्यावर ती पुन्हा भारतात येणार आहे. शिवाय अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरुल्लाहशी निकाह केल्याच्या बातम्याही मंगळवारी प्रसारित झाल्या होत्या. मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंजूने या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. एकामागून एक दोन लव्हस्टोरी घडल्या, तेही सोशल मीडियाच्याच माध्यमातून? सीमा हैदर प्रकरण ताजं असतानाच मंजू पाकिस्तानात पळून गेली. एकीचं प्रेम WhatsApp वर जुळलं, तर दुसरीचं प्रेम Facebook वर खुललं. दोघींनी प्रेमासाठी आपल्या देशाचा सर्वात कट्टर विरोधी असलेल्या देशात जाण्याचं धाडस केलं. या दोन प्रेमप्रकरणांचा आपापसात संबंध तर नाही ना, असा प्रश्न भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित होत आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांमध्ये काही फरकदेखील आहेत, ते म्हणजे अंजू दोन वर्ष वाट पाहून कायदेशीर पद्धतीने व्हिसा मिळाल्यानंतर पाकिस्तानात गेली, तर सीमा ही अवैध पद्धतीने भारतात घुसली. ती इथे कायमची राहायला आली असल्याचं तिचं म्हणणं आहे. तर, अंजू मात्र पुन्हा भारतात येण्याची भाषा करतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात