जम्मू काश्मीर अपघात
श्रीनगर : वैष्णो देवीचा दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. देवीच्या दर्शनासाठी निघालेली बस अचानक दरीत कोसळली. या
भीषण दुर्घटनेत
10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांचा प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटली येथे बस घसरून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे लोक तिथे पोहोचले, बचावकार्य सुरू झालं. 
जम्मूच्या डीसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशमधून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात होती. 16 जखमी प्रवाशांना जम्मू येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही बस 75 प्रवाशांना घेऊन जात होती, त्याच वेळी झज्जर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोटलीजवळ ही बस दरीत कोसळली.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बसमधून प्रवाशांना बाहेर काढले. सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराच्या पथकांनीही घटनास्थळी पोहोचून प्रवाशांची सुटका केली. तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. बाहेर काढलेले मृतदेहही रुग्णालयात नेण्यात आले आहेत. बस काढण्यासाठी क्रेन बोलवण्यात आली आहे.
कारने दोघांना चिरडलं, पण त्यानंतर जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक; Shocking Video Viralउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ही बस अमृतसर इथून आली होती, ज्यामध्ये बिहारचेही भाविक होती. ते रस्ता चुकल्यामुळे इथे पोहोचले असावेत असा अंदाज सहाय्यक कमांडर अशोक चौधरी यांनी व्यक्त केला आहे.