जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - चमत्कार झाला! चिमुकलीला गाडीने चिरडलं, पुढच्याच क्षणी स्वतःच उठून चालू लागली

VIDEO - चमत्कार झाला! चिमुकलीला गाडीने चिरडलं, पुढच्याच क्षणी स्वतःच उठून चालू लागली

कारखाली चिरडली चिमुकली

कारखाली चिरडली चिमुकली

कार अंगावरून जाऊनही चिमुकलीला काहीच झालं नाही.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : आतापर्यंत अपघाता चे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. एखाद्या गाडीची धडक जरी बसली तरी गंभीर दुखापत होते. एखाद्याच्या अंगावरून गाडी गेली तर त्याचं वाचणं अशक्यच. पण काही वेळा चमत्कार होतात आणि भयानक अपघातातूनही लोक चमत्कारित्या बचावतात. असाच अपघाताचा एक चमत्कारिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका चिमुकलीला गाडीने धडक दिली, गाडी तिच्या अंगावरून गेली. कारने चिमुकलीला अक्षरशः चिरडलं. हा अपघात तर धक्कादायक होताच पण त्यानंतर जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक. एवढ्याशा जीवाच्या अंगावरून गाडी जाऊनही तिला काहीच झालं नाही. कारने चिरडूनही चिमुकली बचावली. इतकंच नव्हे तर ती स्वतःच उठून चालू लागली. कारने दोघांना चिरडलं, पण त्यानंतर जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक; Shocking Video Viral व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. रस्त्याने एक चिमुकली चालत जातान दिसते आहे. ती एकटीच आहे आणि रस्त्याच्या अगदी मधोमध आहे. रस्त्याच्या वळणावर येताच समोरून एक कार येते. ही कार या मुलीला उडवते आणि चिरडत जाते. कार मुलीच्या अंगावरून जाते. अपघातानंतरही कार थांबत नाही. कारचालक तशीच गाडी पुढे घेऊन जातो. अपघात झाला तिथं मुलीच्या मदतीलाही कुणी आलं नाही. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. तेच या मुलीच्या बाबतीत घडलं. इतक्या मोठ्या अपघातानंतरही ती स्वत: उठून चालू लागली. याला चमत्कारच म्हणायलं हवं. काळ आला होता पण वेळ नाही, याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो. Road Accident : 7 इंजिनियर विद्यार्थ्यांना रस्त्यात मृत्यूनं गाठलं, भयंकर अपघातात 6 जण जखमी पाहा नेमकं काय घडलं @ReaderTimes2 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील तिवारीपुरातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात