'फॉर्च्युनर' अर्धी कापली, चौघे कसे बचावले? 

सायरस मिस्त्रींच्या मर्सिडिजचा जिथे झाला अपघात, तिथूनच जवळ 'फॉर्च्युनर'चा भयंकर अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील धानिवरीजवळ झाला अपघात

भरधाव फॉर्च्युनर कार कंटेनरला धडकली 

या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली. 

भरधाव कारने अपघातानंतर 3 ते 4 पलटी देखील खाल्ल्या

कारमधील कार चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने बचावले

 या कारमधील कुणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही. 

विमल मैतालिया हे आपल्या कारचालक आणि मुलांसह मुंबईकडे जात होते.

कारमधील सर्वांचा दैव बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही