नवी दिल्ली, 28 मे : अपघाताचे आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. साध्या गाडीने धडक जरी दिली तरी आपल्याला गंभीर दुखापत होते. एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेली तर त्याचा जीव वाचणं अशक्यच. पण तरी काही असे चमत्कारिक अपघात होतात, जे पाहिल्यावर स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अपघाताच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अपघात झाला तो धक्कादायक होता पण त्यानंतर जे घडलं ते त्यापेक्षाही धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही यावर विश्वास बसणार नाही. असं कसं शक्य आहे? असंच आश्चर्यचकीत होऊन तुम्ही म्हणाला. असं नेमकं या अपघातात काय घडलं ते पाहुयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका रस्त्याच्या कडेला दोन व्यक्ती झोपल्या आहेत. दोघंही गाढ झोपेत आहेत. इतक्यात एक कार येते. कारचा वेग तसा कमीच आहे. पण कारचालकाला रस्त्यावर झोपलेले हे लोक कदाचित दिसत नाहीत. त्याची कार त्यांच्या अंगावरून जाते. IPL पाहण्याचा असाही फायदा! अपघातानंतरही बाईकस्वार बचावला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO सुरुवातीला झोपलेल्या व्यक्तीच्या हातावरून तर पुढे झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ही कार जाते. आपल्या गाडीखाली कुणीतरी चिरडलं हे समजताच गाडीतील व्यक्ती लगेच गाडीबाहेर येते. पण तुम्ही पाहाल तर तुम्हालाही धक्का बसेल. कारने ज्या व्यक्तींना चिरडलं ते दोघंही सुखरूप आहेत. त्यांना काही गंभीर झालेलं नाही. फक्त एका व्यक्तीच्या हातावरून कार गेली ती व्यक्ती हात धरून राहिली आहे, कदाचित तिच्या हाताला दुखापत झाली आहे. तर जिच्या डोक्यावरून कार गेली तिला जिवंत पाहूनच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कार डोक्यावरून जाऊनही ही व्यक्ती जिवंत कशी काय राहिली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हायवेवर गाडीतून पडले दारूचे बॉक्स; बेवड्यांसोबत लहान मुले, महिलांनीही लांबवल्या बाटल्या तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं म्हणून. नाहीतर कुणी सांगितलं असतं तर यावर विश्वाच बसला नसता.
@clipsthatgohard ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.