JOIN US
मराठी बातम्या / देश / लग्नात डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली MA पास तरुणी, त्याच्यासोबत पळूनही गेली आणि आता...

लग्नात डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली MA पास तरुणी, त्याच्यासोबत पळूनही गेली आणि आता...

आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही कायद्याने सज्ञान आहोत. कुटुंबियांचा आमच्या लग्नाला विरोध होता, मात्र…

जाहिरात

हे दोघं पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेश पारीक, प्रतिनिधी चुरू, 17 जून : राजस्थानच्या चुरूमध्ये नवविवाहित जोडप्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर नवविवाहित जोडप्याने पोलीस स्थानकात जाऊन सुरक्षेची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, डीजे ऑपरेटर आणि बिसाऊची रहिवासी प्रियंका मेघवाल हे दोघं पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी याबाबत आपापल्या घरी सांगितलं, मात्र प्रियंकाच्या कुटुंबियांनी हे नातं मान्य केलं नाही. त्यानंतर दोघांनी घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद आर्य समाज मंदिरात लग्न केलं. परंतु लग्नानंतर प्रियंकाच्या नातेवाईकांकडून दोघांना जिवेमारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ‘आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही कायद्याने सज्ञान आहोत. कुटुंबियांचा आमच्या लग्नाला विरोध होता, मात्र तरीही आम्ही पळून लग्न केलं. तयामुळे आता आम्हाला नातेवाईकांकडून धमक्या मिळत आहेत. आमच्या जीवाला धोका आहे’, अशी तक्रार या नवविवाहित जोडप्याने पोलिसांत दिली आहे.

प्रियंकाने सांगितलं की, तिच्या कुटुंबियांनी हे नातं न स्वीकारण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जात वेगळी आहे. धर्मेंद्र ओबीसी आणि प्रियंका एससीमधून आहे. शिवाय धर्मेंद्रचे नातेवाईक त्यांचं लग्न आणि प्रियंकाला सून म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत, मात्र प्रियंकाच्या नातेवाईकांचा दोघांच्या नात्याला अजूनही विरोध आहे. महत्त्वाचं म्हणजे 23 वर्षीय प्रियंकाने पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमएपर्यंतच शिक्षण घेतलं असून 24 वर्षीय धर्मेंद्र हा केवळ 12 वी पास आहे. Anuradha nakshatra: अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव असा असतो, जाणून घ्या गुण-दोष दरम्यान, प्रियंका आणि धर्मेंद्र तीन वर्षांपूर्वी भेटले होते. तेव्हापासून ते एकमेकांशी फोनवरून बोलायचे. पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते, मात्र काही वेळ एकमेकांना समजून घेतल्यानंतरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अखेर तीन वर्षांच्या ओळखीनंतर त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्नगाठ बांधली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या