मुंबई, 16 जून : अनुराधा नक्षत्र नक्षत्रांमध्ये 17 व्या क्रमांकावर येते. या नक्षत्रावर शनि ग्रहाचे अधिराज्य आहे आणि त्याची प्रमुख देवता 12 आदित्यांपैकी एक मानली जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात, परंतु कधीकधी ते हट्टी देखील असतात. हे लोक खूप महत्त्वाकांक्षीही असतात. अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ. परिस्थिती कशी हाताळायची ठाऊक असतं- अनुराधा नक्षत्रात जन्मलेले लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि मेहनती असतात. कधी-कधी ते दुहेरी विचारांनाही बळी पडू शकतात. या कारणास्तव ते प्रत्येक बाबतीत खूप विचार करतात आणि यामुळे ते अनेक कामांमध्ये मागेही राहू शकतात. तथापि, त्यांना परिस्थिती कशी हाताळायची हे देखील माहीत असतं. महिलांबद्दल बोलायचे झाल्यास त्या नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. त्यांचे बरेच मित्रही असतात आणि त्यांना सोशल व्हायला आवडते.
करिअर कसे - अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्यांना व्यवसाय करणे चांगले. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमताही प्रचंड आहे. अशा परिस्थितीत त्यांना टीम लीडर, लीडर किंवा लीडरशिप टास्कमध्ये यश मिळते. महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची कारकीर्द चित्रकला इत्यादी क्षेत्रात चांगली वाढू शकते. अभ्यासातही मेहनत घेतात. नातेसंबंधांची काळजी असते - अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्यांचे आई-वडिलांशी चांगले संबंध असतात. वडिलांसोबत त्यांच्या व्यवसायात शक्यतो काम करू नये. या नक्षत्रातील पुरुष हे थोडे जुन्या विचारांचे असतात आणि त्यांची जोडी आधुनिक स्त्रीशी बनते. मात्र, हळूहळू त्यांचे नाते चांगले होत जाते. अनुराधा नक्षत्रात जन्मलेले लोक त्यांच्या नातेसंबंधांची खूप काळजी घेतात. या तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान; अधिकारी बनतात, मोठ्ठा पगार मिळवतात आरोग्य असे असते - अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्यांचे आरोग्य चांगले असते. परंतु दाताचे त्रास, सर्दी, बद्धकोष्ठता अशा समस्या अनेक वेळा उद्भवू शकतात. महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डोकेदुखीची समस्या देखील असू शकते. सूर्याच्या कृपेनं काहीच कमी नाही पडणार; मिथुन संक्राती या राशींना भरभरून देईल सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी - पुरुषांबद्दल बोलायचे तर ते त्यांच्या कुटुंब आणि मित्रांप्रती खूप एकनिष्ठ आणि निष्ठावान असतात. दुसरीकडे, महिला त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक आणि मेहनती असतात. त्यांची निर्णय घेण्याची क्षमताही चांगली असते. दुसरीकडे, नकारात्मक पैलूंबद्दल बोलायचे झाल्यास, पुरुष खूप टीकात्मक, अस्वस्थ आणि रागावलेले असतात. महिला इतरांकडून खूप अपेक्षआ करत असतात. त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यातही अडचण येते. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)