JOIN US
मराठी बातम्या / देश / Google च्या ऑफिसमध्ये धडकला 'कोरोना'; भारतातील ऑफिस बंद

Google च्या ऑफिसमध्ये धडकला 'कोरोना'; भारतातील ऑफिस बंद

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपलं बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 13 मार्च : कोरोना व्हायरसचा विळखा आता जवळपास 100 देशांना बसला आहे. भारतातच 70हून अधिक रुग्ण कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहेत. त्यापैकी 14 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसने आता गुगलच्या कार्यालयातही घुसखोरी केली आहे. गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला तसे आधी सिमटर्मस दिसले होते. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपलं बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कोरोनामुळे गुगलच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 10 एप्रिलपर्यंत हे कर्मचारी घरी राहून ऑफिसचं काम करतील असं सांगण्यात आलं आहे. तर कोरोना व्हायरसची कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर बंगळुरू इथलं कार्यालय बंद करण्यात आलं आहे. हे वाचा- डॉक्टरांनी तयार केलं ‘कोरोना प्रतिबंध जिंगल साँग’,लक्षणांसह प्रतिबंधात्मक माहिती हा कर्मचारी विदेश दौऱ्यावर जाऊन आला होता. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला त्याला फक्त ताप आढळला होता. मात्र काही तासांनंतर कर्मचारी अस्वस्थ झाला त्याने डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. त्याच्या रिपोर्टमधून या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात (India) कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे. शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती, अशी माहिती सरकारने दिली होती. या रुग्णाच्या चाचणीचे रिपोर्ट आले असून त्याला Covid-19 ची लागण झाली होती, हे स्पष्ट झालं आहे. हे वाचा- Coronavirus : शाळेपासून IPL मॅचपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या