Coronavirus : शाळेपासून IPL मॅचपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय

Coronavirus : शाळेपासून IPL मॅचपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन ठाकरे सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी जाहीर केलं.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च :  कोरोना व्हायरसमुळे होणारा Covid-19 हा आजार जागतिक साथीचा रोग असल्याचं बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. त्यापाठोपाठ भारतानेही व्हिसा बंदी करून प्रसार रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन ठाकरे सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी जाहीर केलं.

राजेश टोपे यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू

सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

IPL तिकीट विक्री न करण्याच्या निर्णायवर ठाम

इतक्यात शाळाबंदी नाही. राज्यातली परिस्थती पाहून शाळांसंदर्भातला निर्णय

कोरोनाच्या सरसकट चाचणीचा आग्रह टाळावा. रुग्णाच्या आजाराचा इतिहास पाहूनच निर्णय

गर्दी टाळण्याचे आदेश

संबंधित- कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ; पुण्यात अमेरिकेहून आलेला एक जण पॉझिटिव्ह

पर्यटकांना बाहेर घेऊन न जाण्याचे पर्यटन कंपन्यांना आदेश

जे आता बाहेर आहेत त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी

ज्यांना लक्षणं आहेत आणि जे परदेशातून आलेत त्यांचीच तपासणी होणार

'एन 95' मास्कची फक्त डॉक्टर्स आणि स्टाफला गरज

सॅनिटायझरबाबत आग्रही असू नये, साबण वापरावा.

पुण्यात रुग्णांची संख्या वाढली

कोरोना व्हायरस (Coronavirus) चा धोका वाढला आहे. पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे. महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 12 झाली आहे. दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. आज सापडलेला रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आल्याचं उघड झालं आहे.

वाचा - मराठवाड्यात 'कोरोना'ची एण्ट्री? जालन्यामध्ये पोलिसालाच लक्षणे आढळल्याने खळबळ

महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक अमेरिकेहून परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 60 पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा दिल्ली राज्य सरकारने शाळा, मॉल आणि चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्य बातम्या

मास्क आणि सॅनिटायझरची वाढीव दराने विक्री, पुण्यातील 4 मेडिकल स्टोअर्सवर कारवाई

VIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना? पाहा मुंबईतला उद्योग

 

 

First published: March 12, 2020, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading