विजयवर्गीय यांनी मिथुन यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर या सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, ''मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.' ते यावेळी पुढे म्हणाले की, 'मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे.''तृणमुल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथुन बंगालमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे.