वर्धा,12 मार्च: सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकुळ घातला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी वर्ध्यातील डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंध जिंगल साँग तयार केलं आहे. स्वत: च्याच आवाजात हे गाण गाऊन त्याची ऑडिओ तसंच व्हिडीओ क्लिपही उपलब्ध करण्यात आली आहे.
वर्ध्याचे डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी हे कोरोना प्रतिबंध जिंगल साँग तयार केलं आहे. त्यांनीच ते गायल असून प्रवीण चवरे यांनी त्याला संगीत दिलं आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानं हे गाण प्रोड्यूस केल आहे. 'बात पते की एक बताउ..' या ओळींपासून हे गाण सुरू होतं.
हेही वाचा...Coronavirus : शाळेपासून IPL मॅचपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय
लोकांना सहजगत्या या आजाराची माहिती मिळावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या, याची माहिती होण्यासाठी सर्वांनाच समजेल यास्तव हिंदी भाषेतून हे गीत तयार केल्याचं डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी सांगितलं आहे.
बऱ्याच गोष्टी पुस्तक स्वरूपात लक्षात राहत नाहीत. अशावेळी गाण्याच्या तालावर एखाद गीत तयार केल्यास त्याचा परिणाम अधिक दिसतो.
हेही वाचा.. मास्क आणि सॅनिटायझरची वाढीव दराने विक्री, पुण्यातील 4 मेडिकल स्टोअर्सवर कारवाई
गाण्यातून जनजागृती लवकर होण्यास मदत मिळते, असं डॉक्टर सचिन पावडे यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या गाण्यातून आजाराच्या लक्षणांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचीही माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. गाणं कधीही गुणगुणलं जातं... मोठ्यांसोबतच चिमुकल्यांनाही गाण्यातून बऱ्याच गोष्टी समजण शक्य होतं. कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर गाण्यातून जनजागृतीचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह मानलं जात आहे.
हेही वाचा...कोरोना व्हायरसवर विकसित केली लस, इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश