JOIN US
मराठी बातम्या / देश / आई मला माफ कर! 'तुझ्यासारख्या आईच्या पोटी माझ्यासारखा मुलगा जन्माला आला', VIDEO नंतर मुलाचा मृतदेहच सापडला

आई मला माफ कर! 'तुझ्यासारख्या आईच्या पोटी माझ्यासारखा मुलगा जन्माला आला', VIDEO नंतर मुलाचा मृतदेहच सापडला

त्याच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप लावला आहे. आता या घटनेचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.

जाहिरात

अनस हा वकिली अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गाझियाबाद, 25 जून : संध्याकाळी सोशल मीडियावर 2 व्हिडिओ पोस्ट केले, आईची माफी मागितली आणि रात्री रेल्वे रुळावर मृतदेह सापडला. ही धक्कादायक घटना घडली उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या लोणी भागात. निठोरा गावाजवळ अनस नावाच्या 21 वर्षीय तरुणाचा शनिवारी रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप लावला आहे. आता या घटनेचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत तो रेल्वे स्थानकावर फिरताना दिसत होता. तर दुसऱ्या व्हिडिओत त्याने आपल्या आईची माफी मागितली होती. ‘तुझ्यासारख्या आईच्या पोटी माझ्यासारखा मुलगा जन्माला आला, आई मला माफ कर’, असं त्याने हिंदीतून म्हटलं होतं. हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अनस हा वकिली अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

शनिवारी रात्री 9च्या सुमारास आरपीएफ जवानांना निठोरा गावाजवळ रेल्वे रुळावर तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर याबाबत लोणी पोलिसांनाही कळविण्यात आलं. लोणी पोलीस त्याठिकाणी दाखल झाल्यानंतर या तरुणाची ओळख अनस अशी पटली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी या मृत्यूबाबत शंका उपस्थित करत हंबरडा फोडला. आपल्या मुलाची हत्या झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना धीर देऊन पुढील तपास सुरू केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या