फोटो क्रेडिट - हवामान विभाग
मुंबई : एकीकडे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चक्रीवादळाचा धोका आहे. हे चक्रीवादळ आता पश्चिम बंगालमधून हळूहळू पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम देशातील हवामानावर झाला आहे. कुठे उष्णता खूप जास्त वाढली आहे. तर कुठे मुसळधार पाऊस पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत. एकीकडे मुंबई आणि उपनगरात अंगाची हालीहाली होत आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात काल संध्याकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून कणकवली तालुक्यातील फोंडा इथे पाऊस झाला. यावेळी तिथल्या भागातील वीजपुरवठ्यावर देखील परिणाम झाला होता. विजेच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. मराठवाडा विदर्भात आज कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. त्यामुळे आज वातावरण ढगाळ राहील मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. राजस्थानात 45 अंश डिग्री सेल्सियसच्या वर तापमान गेल्यानं अंगाची लाहीलाही होत आहे.
3 दिवस महत्वाचे! हवामान खात्याने दिला इशारा, अशी घ्या पिकांची काळजीहवामान तज्ज्ञांच्या मते, मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राजस्थानमध्ये उष्णता वाढत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाने इथे अलर्ट दिला आहे. 12 आणि 13 दुपारी दुपारी तापमानात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर जावं असं आवाहन करण्यात आलं आहे. मंगळवारी राजस्थानमधील14 जिल्ह्यांचे तापमान 40 अंश ओलांडले आहे. रात्रीचे तापमान देखील वेगाने वाढत आहे.
Weather Forecast: अवकाळीनंतर विदर्भावर आता नवं संकट, हवामान विभागानं दिला इशारा, Videoदक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटका राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ हळू हळू पुढे सरकत असून बांगलादेश-म्यानमारच्या किनारपट्टीच्या दिशेने उत्तर-उत्तर-पूर्वेकडे जाण्याची शक्यता आहे.