साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 6 मे : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकाची योग्य काळजी घेण्यासाठी कोल्हापुरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. कसे असेल हवामान ? प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दिनांक 6 ते 9 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 6 ते 9 मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 35° ते 36° सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 34° ते 37° सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात कमाल तापमान 36° ते 37° सेल्सिअस, तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील किमान तापमान अनुक्रमे 18° ते 20°, 20° ते 22°, 20° ते 22° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 13 किमी पर्यंत, 12 ते 17 किमी आणि 11 ते 14 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या पिकांची घ्या काळजी भुईमुग - लवकर लागवड केलेल्या आणि पक्क आलेल्या भुईमुग पिकाची काढणी करावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ऊस - सुरु ऊस लागवडीस मोठ्या बांधणीच्या वेळी रासायनिक खतांची मात्रा न 100 किलो (युरिया 217 किलो), स्फुरद 55 किलो (सिंगल सुपर फॉस्फेट 344 किलो) आणि पालाश 55 किलो(म्यूरेट ऑफ पोटॅश 92 किलो) प्रती हेक्टरी प्रमाणात द्यावी. कांदा - पक्क झालेल्या कांदा पिकाची त्वरित काढणी करून घ्यावी. तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. कांदा पिकाची काढणी केली असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शेतामध्ये गोळा केलेले कांदे पॉलीथिन शीटने झाकावेत. सूर्यफुल - पावसाची शक्यता असल्याने पकलेल्या फुलपिकाची त्वरित काढणी करावी. काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सांगलीच्या शेतकऱ्यांनी लखपती होण्यासाठी शोधला नवा मार्ग, ‘या’ पिकाच्या लागवडीतून झाले मालामाल, Video
वांगी - मागील आठवड्यामध्ये इगाळ हवामान राहिल्यामुळे वांगी पिकावर काही ठिकाणी पांढल्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच डायफेनथियुरॉन 50 % डब्ल्यू 12 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. शेतामध्ये चिकट सापळे एकरी 20 ते 25 या प्रमाणात लावावेत.
मिरची - कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 30 ई.सी. 5 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
आंबा - आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नुतन झेल्याच्या सहाय्याने 80 ते 85 टक्के पक्वतेला काढावीत. केलेली सुरक्षित उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि फळामध्ये माका तयार होण्याचे टाळण्यासाठी काढलेली फळे सावलीत ठेवावीत आणि शक्यतो आंब्याची वाहतुक रात्रीच्या वेळी करावी. आंबा फळे काढणीच्या किमान 8 दिवस अगोदर झाडावर कोणतेही औषध फवारू नये. पाऊस तसेच वाऱ्यामुळे फळगळ झालेली असल्यास खराब फळे गोळा करून नष्ट करावीत.
द्राक्ष - द्राक्ष फळबागेमध्ये खरड छाटणी करून घ्यावी. द्राक्षवेलीच्या काडीवरील डोळ्यामध्ये सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी खरड छाटणी महत्वाची असते. खरड छाटणी वेळेवर करुन छापलेल्या काड्या आणि पाने बांधावर न टाकता दूरवर जाळून नष्ट कराव्यात. खरड छाटणी नंतर फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असताना द्राक्ष बागेस 12750 ते 15300 लिटर प्रती एकर इतके पाणी द्यावे.
नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video
डाळिंब - कमाल तापमान जास्त असल्याने डाळिंबामध्ये पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. फळांना पेपर बॅग लाऊन फळांचे संरक्षण करावे.
जनावरे - ईशारा कालावधी दरम्यान जनावरे शक्यतो बाहेर चरावयास नेऊ नयेत. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक औषध द्यावे. जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये तापमान नियंत्रणासाठी पंखे तसेच फॉगर्स उपलब्ध करावेत. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)