विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 9 मे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे संपूर्ण एप्रिल महिन्यात वातावरणात कमालीचा बदल होऊन जणूकाही उन्हाळा हद्दपारच केला होता. मात्र मे महिन्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असल्याने तापमान सामान्य पातळीवर येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस संपूर्ण प्रदेशात दिवसाच्या तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 12 मेपर्यंत कमाल तापमान 40-45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 12 मेपर्यंत कमाल तापमान 40-45 अंश सेल्सिअस पर्यंत विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांतील दिवसाचे तापमान रात्रभर 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढल्याने विदर्भवासीयांना उकाडा जाणवू लागला आहे. सोमवारी अकोल्यात सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती 38.8 गडचिरोली 38 वाशिम 35.4 , वर्धा 39, बुलढाणा 36.6, चंद्रपूर 36.6, ब्रह्मपुरी 35.4 नागपूर 38.9 आणि यवतमाळ 37.5 नोंद झाली आहे. आगामी काळात जिल्ह्यातही 24 तासांत 3 अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी नागपूरचे तापमान 37.2 अंश सेल्सिअस होते. तर रविवारी तापमान 38.9 अंश सेल्सिअस होते आणि सोमवारी 38.9 इतकी नोंद झाली आहे. सोमवार 8 मे रोजी वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 9 मे रोजी गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर या भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 12 मेपर्यंत कमाल तापमान 40-45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
8 आणि 9 मे रोजी पावसाची शक्यता कमीच अनेक दिवसांच्या सापेक्ष थंडीनंतर दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे आता खरा उन्हाळा सुरू झाला असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. एप्रिलच्या अखेरीस बंद पडलेले कुलर लोकांनी पुन्हा सुरू केले. मधूनमधून येणारे वादळ, गारपीट, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस यामुळे गेले तीन महिने थंड हवामानामुळे तुलनेने आरामात गेले. उन्हाळ्यातील हवामानाप्रमाणे राज्यातील नागरिकांनी मान्सूनचा अनुभव घेतला. नागपूर प्रादेशिक मौसम विभागाने 8 आणि 9 मे रोजी पावसाची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. येत्या दोन दिवसांसाठी कोणताही इशारा दिला नाही. 12 मे पर्यंत तापमान 40-42°C पर्यंत पोहोचेल आयएमडी, नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार म्हणाले की, प्रदेशात उत्तर-पश्चिमी वारे सुरू झाले आहेत. हे वारे कोरडे आणि उष्ण आहेत आणि त्यामुळे तापमानात वाढ होईल. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 12 मेपर्यंत कमाल तापमान 40-42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. हे सामान्य तापमान असेल कारण मे महिन्यात साधारणपणे या प्रदेशात 43 अंश सेल्सिअस तापमान असते. Nagpur News: 5 नद्यांच्या संगमावर आहे अंभोरा तीर्थक्षेत्र, रामायण, महाभारतशी आहे कनेक्शन, PHOTOS एप्रिल महिन्यात घडला दुर्मीळ योग एप्रिल महिन्यात गडगडाट, विजांचा कडकडाट, वारा, गारपीट आणि पाऊस दिसला. उन्हाळ्यात ही दुर्मिळ घटना आहे. 1937 मध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक 129 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या एप्रिलमध्ये 81.2 मिमी पाऊस दुसऱ्या क्रमांकावर होता. पावसाळ्यातील तापमान या एप्रिल आणि मे महिन्यात अनुभवायला मिळाले. एप्रिलमध्ये सामान्य आर्द्रता 20% असली तरी ती यावर्षी 70 ते 80% पर्यंत गेली आहे. बहुतेक दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास सामान्यापेक्षा कमी होते, असे डॉ कुमार म्हणाले. तीव्र उन्हाळ्यानंतर चांगला मान्सून येतो, असा लोकांचा समज आहे. मात्र, यंदा हलका उन्हाळा असला तरी मान्सून सामान्य राहील, अशी ग्वाही हवामान खात्याने दिली आहे.