JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News : एकाच वेळी 8 केक कापले, अन् बर्थडे बॉयच्या चेहऱ्याने घेतला पेट, वर्ध्यातील धक्कादायक घटनेचा Video

Wardha News : एकाच वेळी 8 केक कापले, अन् बर्थडे बॉयच्या चेहऱ्याने घेतला पेट, वर्ध्यातील धक्कादायक घटनेचा Video

वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना तरुणाच्या तोंडाला आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात

केक कापताना तरुणाच्या तोंडाला आग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा,  19 जून, नरेंद्र मते :  वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली, या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला. वर्ध्याच्या सिंधी मेघे येथील ही घटना आहे. रितीक वानखेडे असं या बर्थडे बॉयचं नाव आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारला, याचवेळी फायन गनमधून निघालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत रितीकच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. बर्थडे पार्टीमधील धक्कादायक प्रकार  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रितीक वानखेडे यांचा रविवारी बर्थडे होता. त्याच्या बर्थडेनिमित्त सायंकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला रितीकचे मित्र देखील उपस्थित होते. तो आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापताना त्याच्या तोंडावर स्प्रे मारला गेला. याचवेळी फायर गनमधून निघालेली आगेची ठिणगी स्प्रेवर पडली अन् आगीचा भडका उडाला. सुदैवानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळला.

संबंधित बातम्या

किरकोळ जखमी  या घटनेत बर्थडे बॉय रितीक हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत रितीक थोडक्यात बचावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या