आजच्या सोशल मीडियाच्या युगात भावना व्यक्त करण्याला आणि तेही सार्वजनिकरीत्या व्यक्त करण्याला खूपच महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे अनेकांकडून आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते. ती गोष्ट सुखाची आहे की दुःखाची यानुसार त्यावर इतरांकडून प्रतिक्रिया म्हणून कौतुक केलं जातं किंवा सांत्वन केलं जातं. प्रत्येक सणाच्या तर शुभेच्छा दिल्या जातातच; पण अगदी छोट्या-छोट्या दिवसांच्याही शुभेच्छा दिल्या जातात. यात अगदी सर्वसामान्य माणसांपासून सेलेब्रिटी, राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. अर्थातच, या सगळ्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) देण्याचं महत्त्व आणि प्रमाण या दोन्हींमध्येही खूप वाढ