JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राऊतांचा दौरा अन् अख्खी नगरपंचायत शिंदे गटात; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

राऊतांचा दौरा अन् अख्खी नगरपंचायत शिंदे गटात; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना जिल्ह्यात ठाकरे गटला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात

शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 4 मे : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांचा हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे. संजय राऊतांवर आरोप सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे. शिंदे गटात गेलेले नगरसेवक भारत वाघमारे- नगराध्यक्ष, सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता) भगवान आहेर- नगरसेवक पुष्पाताई वाघमारे - नगरसेविका अरुणाताई वाघमारे - नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे - नगरसेविका दिनेश वाघ - कार्यकर्ते विलास गोसावी - कार्यकर्ते चारोस्कर - कार्यकर्ते गौरव सोनवणे - कार्यकर्ते

Vinayak Raut : पंकजा मुंडे आल्या तर…, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं मोठं विधान

संबंधित बातम्या

मुंबईतील नगरसेवकांचा प्रवेश दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईतील दोन नगरसेवकांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या