रत्नागिरी, 3 जून : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. आज गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांनी तसे संकेतही दिले आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पंकजा मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार विनायत राऊत यांनी शनिवारी रत्नागिरी ते मुंबई असा ट्रेमनमधून प्रवास केला. त्यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकतमचे न्यूज को-ऑर्डिनेटर तुषार शेटे यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला. त्यावेळी ते बोलते होते. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागत : विनायक राऊत खासदार विनायत राऊत यांनी यावेळी बोलताना विविध विषयांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय राजकीय मुद्यांवरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणाने खालची पातळी गाठली असून नळावरच्या भांडणापेक्षा राजकारण्यांची भांडणं खालच्या स्तराला गेल्याचं त्यांनी सांगितलं. नाराजीमुळे पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम केला तर उद्धव ठाकरे त्यांचं शिवसेनेत आल्या तर स्वागत करतील असंही राऊत म्हणाले. पंकजा मुंडे ‘त्या’ चर्चांवर स्पष्टच बोलल्या मला जर भुमिका घ्यायची असेल तर असेच माध्यमांना बोलावून छातीठोकपणे बिंदास्त भुमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणारे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना मी विसवू देणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला इशारा दिला आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वाचा - ‘सोयीची चोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदाच’ ‘लाव रे तो व्हीडिओ’वरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली अनेक लोक निवडणुकांमध्ये हारले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझनभर आमदार-खासदार झाले. गेल्या चार वर्षात मी मात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. माझ्या मनात गाढ विश्वास आहे. माझे नेते अमित शाह आहेत. त्यांची भेट घेणार आहे. त्यांना वेळ मागितला आहे. त्यांना मी विचारणार आता माझे वडील जिवंत नाही. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडला. त्यांच्याशी मी बोलणार आहे. हितचिंतक खूप आहेत. सगळ्याच पक्षात आहेत आणि दुसऱ्याही पक्षात आहेत. मी दररोज रडगाणं गाणारी नाही. बाप मेला तरी माझ्या डोळ्यात अश्रू येवू दिले नाही, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.