मनसेचं संजय राऊतांना पत्र
मुंबई, 22 फेब्रुवारी : मनसेने पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिलं असून, ते पत्र त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलं? **’**आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र ! हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. हेही वाचा : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं पुढचं प्लॅनिंग ! कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल .
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा’ ! अंस या पत्रात संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.