मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं पुढचं प्लॅनिंग !

आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं पुढचं प्लॅनिंग !

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गट अडचणीत आला असून, ठाकरे गट समर्थक आमदारांचे विधानसभा सदस्यपद धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद ,  22 फेब्रुवारी : निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे सर्वधिकार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटामध्ये असलेले आमदार अडचणीत येऊ शकतात अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता याबाबत शिंदे गटाच्या आमदाराकडून संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकेर यांची आमदारकी टिकणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट 

येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही व्हीप काढणार आहोत, हा व्हीप शिवसेनेतील सर्व आमदारांना लागू होणार आहे. आम्हलाही लागू होईल आणि त्यांना देखील लागू होणार आहे. जर कोणी व्हीप मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई होईल असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ असा की आता आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाचा व्हीप मान्य करावा लागेल, जर त्यांनी व्हीप मान्य केला नाही तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.

सुनावणीबाबत सकारात्मक  

पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टात सध्या सुरू असलेल्या सुनावणीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही कोणत्याही शाखेवर कब्जा करणार नाहीत, कारण राज्यात कुठंही पक्षाच्या नावावर शाखा नाहीत, शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे, मंदिरावर कब्जा होत नसतो. आम्ही जेव्हा शिवसेना भवनसमोरून जाऊ तेव्हा आम्ही आमचं मस्तक झुकवू असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच आता आम्हाला शिंदे गट म्हणू नका आम्हाला शिवसेना म्हणा असंही शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos