JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दुध फ्रीजमध्ये ठेवलं तरी होतं का खराब? मग त्यामागे असू शकतं हे कारण

दुध फ्रीजमध्ये ठेवलं तरी होतं का खराब? मग त्यामागे असू शकतं हे कारण

अनेक वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की फ्रीजमध्ये दुध ठेवलं तरी देखील कसं खराब झालं?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून : दुध बराच काळ बाहेर राहिला तर तो हळूहळू खराब होऊ लागतो. ज्यामुळे मग लोक त्याला फ्रिजमध्ये ठेवतात. पण तरी देखील काही लोकांना दुध खराब होण्याची समस्या उद्भवते. त्यावेळी अनेकांना असा प्रश्न पडतो की फ्रीजमध्ये दुध ठेवलं तरी देखील कसं खराब झालं? यामागचं एक कारण आहे दूध ठेवण्याची जागा. दुध दही होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवणे पुरेसे नाही. ते योग्य ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे. मधूमेहाच्या पेशन्टसाठी नारळपाणी चांगलं की वाईट, यामुळे रक्तातील साखर वाढते का? तज्ञांची एक टीम म्हणते की, दूध जास्त काळ टिकवण्यासाठी लोक ते सहसा दाराकडे ठेवतात, पण हे त्याचे योग्य ठिकाण नाही. असे केल्याने आपण दुधाचे शेल्फ लाइफ कमी करतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला दूध फुटण्यापासून वाचवायचे असेल तर ते फ्रीजच्या मुख्य भागात ते ठेवा. दरवाजाच्या भागात नाही, कारण तो फ्रीजचा सर्वात कमी थंड भाग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या फूड पॉलिसीचे रीडर डॉ ख्रिश्चन रेनॉड्स म्हणतात, दूध ही नाशवंत गोष्ट आहे. म्हणूनच फ्रीजच्या कोणत्या भागात ते साठवायचे आणि तेथील तापमान किती आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? या संशोधन प्रकल्पाशी संबंधित डॉ. रेनॉल्ड्स म्हणतात, आमच्याकडे घरगुती उत्तेजनाचे मॉडेल आहे जे गेल्या 6 वर्षांपासून लोक दुध कसे वापरतात यावर लक्ष ठेवत आहेत. ते म्हणतात, फ्रीजचे तापमान 0 ते 5 अंश सेंटीग्रेड असते. अशा तापमानात अशा गोष्टी सुरक्षित ठेवता येतात. तापमान 5 अंशांच्या खाली राहिल्यास दुधाचे आयुष्य आणखी एक दिवस वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीज आणि दूध यासारख्या गोष्टी जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजात ते ठेवू नका ते फ्रिजमध्ये मागच्या बाजूला ठेवा. जेणेकरून ते किमान तापमान मिळेल आणि खराब होणार नाही. ब्रिटनमध्ये असे दिसून आले आहे की, लोक फ्रिजच्या तापमानात ते राखत नाहीत. अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये कोणते तापमान कशासाठी ठेवावे हे लक्षात घेतले पाहिजे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा नियम केवळ दुधाबाबत नाही तर इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी आहे. चीज, दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ फ्रीजच्या खोलगट भागात साठवून ठेवावेत, परंतु सहसा असे होत नाही कारण पॅकेटवरील एक्स्पायरी डेटपर्यंत दुध उकळत नाही आणि ते फ्रीजमध्ये ठेवणे पसंत करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या