मुंबई, 14 जून : असे अनेक लोक असतील ज्यांना कामासाठी अनेकदा हॉटेलसमध्ये मुक्काम करावा लागत असेल. तसेच काही लोक सुट्टी घालवण्यासाठी देखील हॉटेलमध्ये राहतात. वेगवेगळ्या हॉटेल आणि स्टार्सनुसार आपल्या वेगवेगळ्या सुविधा मिळतात. परंतु हॉटेलमध्ये रहाणे किती सुरक्षित असू शकतं, यावर प्रश्न चिन्ह उभ राहिलं आहे. असे अनेक प्रकरण समोर आले आहेत, ज्यामध्ये अनेक हॉटेल्समध्ये खोल्यांमध्येच छुपे कॅमेरे बसवले जातात. त्यामुळे लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. एका महिलानं आपल्या सोबतचा एक अनुभव देखील शेअर केला आहे. हॉटेलला 3 स्टार, 5 स्टार असं रेटिंग्स का आणि कोण देतं? कधी विचार केलाय? सोशल मीडियावर डच एअरलाइनच्या एका एअर होस्टेसने लोकांना आणखी एक प्रकार सांगितला. तिने लोकांना सांगितले की, तुम्ही जेव्हाही हॉटेलमध्ये थांबता तेव्हा सर्वात आधी तुमच्या पलंगाखाली पाण्याची बाटली जोरात फेकून द्या. ही कल्पना तुम्हाला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. आता तुम्ही विचार कराल की पलंगाखाली बाटली फेकून देण्याच्या सुरक्षिततेशी काय संबंध आहे? यामुळे कशी काय तुमची सुरक्षितता टिकू शकते?
फ्लाइट अटेंडंट एस्थरने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कामामुळे तिला अनेकदा हॉटेलमध्ये राहावे लागते आणि ती नेहमी तिच्या पलंगाखाली पाण्याची बाटली फेकते. तरुणींना हॉटेल रुममध्ये दिसली धक्कादायक गोष्ट, पाहून सरकली पायाखालची जमीन पलंगाखाली पाण्याची बाटली टाकताच कळेल की पलंगाखाली कोणी लपले आहे की नाही. खाली कोणी नसेल तर पाण्याची बाटली दुसऱ्या बाजूने बाहेर येईल. जर असे झाले नाही तर ताबडतोब खोलीतून बाहेर पळा. कारण याचा अर्थ असा होतो की तुमच्या बेडखाली कोणीतरी लपलं आहे. याशिवाय इस्थरने आणखी अनेक युक्त्या शेअर केल्या आहेत. तिने सांगितले की ती नेहमीच तिचे शूज हॉटेलच्या खोलीच्या लॉकरमध्ये ठेवते. जेणेकरून जेव्हा ती हॉटेलमधून बाहेर पडते तेव्हा तिला लॉकरमधून मौल्यवान वस्तू काढण्याची आठवण होते.