JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Valentine Day 2023 : गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडल्यास काय कराल? हे अधिकार माहीत आहे का?

Valentine Day 2023 : गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडल्यास काय कराल? हे अधिकार माहीत आहे का?

अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. अट फक्त एकच आहे.

जाहिरात

लग्नाशिवाय कपलने लॉजवर राहणं गुन्हा नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 फेब्रुवारी : आजपासून जगभरात प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे. अशात अनेक जोडपी बाहेर फिरण्यासाठी पडतात. मात्र, अशा अविवाहित जोडप्यांना अनेकदा पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक बाग असो की अन्य ठिकाण बॅचलर कपल्सला नेहमीच याची भीती सतावत असते. हॉटेलमध्ये खोलीत राहणे तर दूरची गोष्ट. मात्र, जर तुम्हाला कायद्याची थोडी माहिती असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ..तर अशा वेळी घाबरू नका तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये राहत असाल आणि पोलीस आले तर सर्वात पहिला नियम म्हणजे घाबरण्याची गरज नाही. अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणासोबतही राहण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाहित जोडप्याला त्रास दिला किंवा अटक केली, तर ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम 226 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात. वाचा - Valentine Week 2023 Wishes: रोज डे ते किस डे पर्यंत प्रेमाच्या 7 दिवसांचे महत्त्व; एकही दिवस मिस नका करू पोलिसांविरोधात कुठे तक्रार कराल? हॉटेलमध्ये राहणाऱ्या अविवाहित जोडप्याला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा त्यावरील पोलीस अधिकाऱ्याकडेही तक्रार करता येईल. याशिवाय पीडित दाम्पत्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे.

हॉटेल प्रशासनाही अविवाहित जोडप्याला रोखू शकत नाही हॉटेल अविवाहित जोडप्याला दोघांनी विवाहित नसल्याच्या कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. याचा अर्थ अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहता येते. याशिवाय, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये असा कोणताही नियम नाही, ज्यामुळे अविवाहित जोडप्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यास प्रतिबंध होतो. पोलीस हॉटेलवर छापा का टाकतात? अविवाहित जोडप्याला अटक करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी पोलीस हॉटेल्सवर छापे टाकत नाहीत. देशात वेश्याव्यवसाय हा गुन्हा मानला जातो. अशा वेश्याव्यवसायाच्या विरोधात किंवा गुन्हेगार लपल्याच्या संशयावरून पोलीस हॉटेलमध्ये छापे टाकतात. हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलीस त्यांच्याकडे आले तर अशा जोडप्याने घाबरण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार, अशा जोडप्याला त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत असल्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नसल्याचे सिद्ध होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या