नव्या वर्षाच्या आगमनाबरोबर ज्या अनेक गोष्टींचे वेध तरुणाईला लागतात त्यांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारीला साजरा होणारा व्हॅलेंटाइन्स डे. गेल्या काही वर्षांत तरुणाईचा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अशी या व्हॅलेंटाइन्स डेची ओळख निर्माण झाली आहे हे खरं; पण व्हॅलेंटाइन्स डे किंवा प्रेम व्यक्त करणं हे फक्त तरुणाईपुरतंच नाही, तर अगदी कुठल्याही वयात साजरं होऊ शकतं याचा स्वीकार हळूहळू होतान