JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Relationship Tips : शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी खाऊ नये च्युइंगम! पाहा यामागचे कारण

Relationship Tips : शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी खाऊ नये च्युइंगम! पाहा यामागचे कारण

प्रेम आणि फिजिकल इंटिमेसीचे याबाबत अनेकांमध्ये खूप आकर्षण असते. रोमान्स आणि फिजिकल इंटिमेसीमुळे प्रेमाचं नातं आणखी मजबूत होतं असं मानलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी : सध्या ‘व्हॅलेंटाईन विक’ म्हणजेच प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा आठवडा सुरु आहे. प्रेम करणे आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा काळ आहे. या काळात अनेक प्रियकर-प्रेयसी एकमेकांसोबत रोमँटिक होतात. प्रेम आणि फिजिकल इंटिमेसीचे याबाबत अनेकांमध्ये खूप आकर्षण असते. रोमान्स आणि फिजिकल इंटिमेसीमुळे प्रेमाचं नातं आणखी मजबूत होतं असं मानलं जातं. अनेक लोक इंटिमेट होण्याआधी आपला श्वास ताजा असावा आणि तोंडातून दुर्गंधी येऊ नये यासाठी च्युइंगम खातात. परंतु यामुळे तुमचा अनुभव वाईट होऊ शकतो. च्युइंगम खाल्ल्याने श्वास ताजा राहतो असे अनेकांना वाटते. परंतु तज्ज्ञांनुसार इंटिमेट होण्याआधी किंवा चुंबन घेण्यापूर्वी च्युइंगम खाणे चुकीचे मानले जाते.

‘मौन’ म्हणजे नात्यात आलेला व्हायरस, वेळीच वागणं बदललं नाही तर कायमचं तुटू शकतं नातं

संबंधित बातम्या

इंटिमेट होण्याआधी का खाऊ नये च्युइंगम? हरजिंदगीच्या रिपोर्टनुसार, तुम्ही जेव्हा च्युइंगम खाता तेव्हा तुम्ही ते सहाजिकच गिळत नाहीत, त्यामुळे पोटात फक्त हवा पोहोचते आणि त्यामुळे ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. च्युइंगम चघळताना पोटाला वाटते की शरीरात अन्न येत आहे. त्यामुळे पाचक एंजाइम बाहेर पडू लागतात. यामुळे पोटात गॅस भरू लागतो आणि गॅस्ट्रिकचा त्रास होतो.

टेस्टोस्टेरॉन हार्मोन प्रभावित होतो भरपूर च्युइंगम खाल्ल्यास खूप ढेकर येतात आणि पोटातील हवा बाहेर पडते. अशावेळी तुम्हाला तोंडातून दुर्गंधीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शारीरिक संबंध करण्यापूर्वी तुम्ही च्युइंगम खाऊ नये. च्युइंगममध्ये असलेला पेपरमिंट हा सर्वात महत्त्वाचा घटक सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन कमी करतो आणि त्याचा परिणाम कामवासनेवर होतो. त्यामुळे तुमचा शारीरिक आनंदही कमी होतो. श्वास ताजा ठेवण्यासाठी काय करावे? इंटिमेट होण्यापूर्वी तुम्हाला ताजा श्वास हवा असेल तर तुम्ही दात घासून तोंड स्वच्छ करू शकता. किंवा माउथ वॉश देखील वापरू शकता. श्वास ताजा ठेवण्यासाठू तुम्ही पाणी पिऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर सफरचंदाचा तुकडा खा. तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. Love story : ड्रायव्हरने गिअर टाकताच तरुणीच्या काळजात धडधडलं; लग्न करून त्याला घरजावईच बनवलं (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या