कराची, 01 नोव्हेंबर : एखादी व्यक्ती गाडी चांगली चालवते म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केलं असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग स्किल किंबहुना त्याच्या गिअर टाकण्याच्या पद्धतीवर एक मुलगी इतकी फिदा झाली की त्या ड्रायव्हरच्या प्रेमातच पडली. तिने त्याच्याशी लग्नही केलं आणि साधा ड्रायव्हर करोडपतींचा घरजवाई झाला. व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर ही खास लव्ह स्टोरी तुमच्यासाठी. श्रीमंत मुलगी पटावी असं कित्येक तरुणांना वाटतं. यासाठी हे वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी किती पापड बेलावे लागतात हे काही तरुणांना माहिती असेलच. पण एका साध्या ड्रायव्हरने फक्त एका गिअरवर श्रीमंत मुलगी पटवली आहे. जिथं हा तरुण ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याच मालकाची मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं. हे वाचा - MBBS डॉक्टरचा चहावाल्यावर जडला जीव, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video प्रेम आंधळं असं म्हणतात ते खोटं नव्हे. प्रेम कधी, कुठे, कसं आणि कुणावर होईल सांगू शकत नाही. प्रेमाला धर्म-जात, श्रीमंत-गरीब अशी कशाचीच बंधनं नसतात. असंच प्रेम आहे ते पाकिस्तानातील या दाम्पत्यामध्ये. तरुणी आपल्या ड्रायव्हरकडून ड्रायव्हिंग शिकत होती. एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, ड्रायव्हिंग शिकता शिकता ती त्याच्या प्रेमात पडली आणि याचं कारण म्हणजे ड्रायव्हरने टाकलेला गिअर. तेव्हा तिने ड्रायव्हरला कारचा गिअर बदलताना पाहिलं तेव्हा तिला त्याचा अंदाज इतका आवडला आणि ती वयाच्या सतराव्या वर्षी ती 21 वर्षीय या ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. तिने सांगितलं की, तिला गाडी शिकताना बऱ्याचदा ड्रायव्हरचा हात धरण्याची इच्छा झाली होती. हे वाचा - VIDEO - लिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; 20 वर्षीय तरुणीने 60 वर्षांच्या कॉस्मेटिक विक्रेत्यासोबतच थाटला संसार शेवटी तिने आपण लग्न केलं तर याच्याशीच करू असं तिनं ठरवलं आणि तिने तसंच केलं. दोघांनी लग्न केलं. ड्रायव्हर तिच्याकडे घरजावई म्हणून राहू लागला.
एकमेकांसोबत लग्न करून दोघंही आनंदात आहेत आणि सुखाने संसार करत आहेत. तरुणीने सांगितलं की तिला आपल्या नवऱ्याच्या गिअर बदलण्याच्या स्टाईलशिवाय त्याच्या सर्व सवयी आवडतात.