दिल्ली, 18 नोव्हेंबर: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनातल्या सुख-दु:खांचा आपल्या कुंडलीतल्या नऊ ग्रहांशी थेट संबंध असल्याचं म्हटलं जातं. ग्रहांच्या शुभयोगांमुळे जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं. अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसाय, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं, असं म्हटलं जातं. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी आणि नवग्रहांचं शुभफळ मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत. ग्रहांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित देवतांची पूजा करणं हा अत्यंत सोपा उपाय असल्याचं म्हटलं जातं. नवग्रहांचे दोष निवारण करून जीवनात यश, धन-वैभव आणि समृद्धी कशी मिळवावी, हे जाणून घेऊ या. याबाबतची माहिती `टीव्ही 9 हिंदी`ने दिली आहे. केतू : केतूचा (Ketu Planet) प्रकोप झाल्यास अशुभ परिणाम होतात. जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. अशा स्थितीत केतू ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी गणपतीची साधना करावी. गणेशाची पूजा केल्यास दोष दूर होतील. राहू : कुंडलीत राहू (Rahu) अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला सहजपणे यश मिळत नाही आणि समस्या कायम राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार राहू अशुभ स्थितीत असल्यास जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हे दूर करायचं असेल तर भैरवाची पूजा करावी. धनवृद्धीसाठी वास्तुशास्त्रातले `हे` उपाय ठरतील फायदेशीर शुक्र : शुक्र हा ज्योतिषशास्त्रानुसार एक शुभ ग्रह (Shukra grah) मानला जातो. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रहाशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी. शनी : शनी (Saturn) ग्रहाचं नाव ऐकताच लोक घाबरतात. कुंडलीत शनी काही विशिष्ट ठिकाणी असला, तर तो मोठ्या अडचणी निर्माण करतो. मकर आणि कुंभ राशीवर शनीचा जास्त प्रभाव पडतो, असं म्हटलं जातं. अशुभ परिणाम दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करावी. शनीशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी भगवान शिवाची उपासनाही खूप फलदायी असल्याचं म्हटलं जातं. गुरू : ग्रहमालिकेतला सर्वांत मोठा आणि जुना ग्रह म्हणजेच गुरू (Jupiter) आहे. गुरू ग्रहाची उलटी चाल झाल्यास विष्णू किंवा ब्रह्माजींची पूजा करावी. गुरू प्रसन्न असल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते आणि बौद्धिक गुणवत्तेतही वाढ होते, असं म्हणतात. धनू आणि मीन राशीचा गुरू स्वामी आहे. बुध : बुध (Mercury) हा सूर्यमालेतला सर्वांत लहान ग्रह आणि सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा करण्यास सांगितलं जातं. हा बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि सौंदर्याशी संबंधित आहे. स्वप्नातलं घर साकारण्यासाठी प्लॉट घेताय? वास्तुशास्त्रातील हे नियम वाचा मंगळ : सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ (Mars) आहे. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. मंगळ ग्रह ऊर्जा आणि धैर्याचं प्रतीक आहे. मंगळाचे शुभ परिणाम व्हावेत, यासाठी विशेषत: मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. चंद्र : चंद्र (Moon) हा कर्क राशीचा स्वामी असल्याचं म्हटलं जातं. चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची उपासना अत्यंत लाभदायक मानली जाते. तसंच सोमवारी शिवाची पूजा करावी. सूर्य : सूर्य (Sun) कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असल्यास रविवारी सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्याचं शुभफळ प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेची पद्धत सांगितली आहे.