मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /स्वप्नातलं घर साकारण्यासाठी प्लॉट घेताय? वास्तुशास्त्रातील हे नियम वाचा

स्वप्नातलं घर साकारण्यासाठी प्लॉट घेताय? वास्तुशास्त्रातील हे नियम वाचा

मुंबई, 17 नोव्हेंबर : स्वतःचं हक्काचं घर हे आता प्रत्येकाचं स्वप्न झालं आहे. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकाल ही महत्त्वाची गरज मानली जाते. आर्थिक पाठबळ आता कमी त्रासात उपलब्ध होत असल्याने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणेही सोपं होऊ लागलंय. घराबद्दलच्या संकल्पना बदलत चालल्याने अनेकजण आता रेडीमेड घरे घेण्यापेक्षा जमीन (Land) किंवा प्लॉट (Plot) घेऊन आपलं स्वप्नातलं घर साकारत असल्याचे पहायला मिळत आहे. तुमच्याही मनात असाच विचार असेल तर प्लॉट घेण्याअगोदर वास्तूशास्त्रातील या गोष्टी नक्की वाचा.

स्वमालकीचं घर (Home) असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकजण त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो. स्वमालकीच्या घरासाठी जितक्या आर्थिक बाबी महत्त्वाच्या असतात, तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे जमीन (Land) किंवा प्लॉट (Plot). आपलं घर प्रशस्त असावं, या दृष्टिकोनातून एखाद्या गृह प्रकल्पात घर घेण्याऐवजी काही जण जमीन खरेदी करून त्यावर मनातलं घर साकारतात. नव्या घरात सुख-समृद्धी नांदावी अशीदेखील प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे काहीजण योग्य प्लॉट निवडण्यासाठी वास्तुशास्त्राचा (Vaastu Shastra) आधार घेतात. वास्तुशास्त्रानुसार, योग्य जमिनीवर घर बांधलं तर त्यात सुख-समृद्धी कायम राहते, भरभराट होते. मात्र, अयोग्य जमिनीवर घर बांधल्यास घरमालकास अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं, असं मानलं जातं. घरबांधणीकरिता योग्य प्लॉट अर्थात जमीन कशी निवडावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. याविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

घरबांधणीच्या उद्देशानं भूखंड अर्थात जमीन खरेदी करताना काही गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्रानुसार, घरबांधणीकरिता चौकोनी प्लॉट (Square Plot) शुभ मानला जातो. अशा प्लॉटवर घर बांधल्यास घरातल्या सदस्यांना सुख-समृद्धी आणि समाधान मिळतं. घरबांधणीकरिता आयताकार प्लॉटदेखील चांगला मानला जातो.

Vastu Tips : घरातल्या या 5 वस्तू करतील संपत्तीच्या वाटा बंद; आजच फेका

वास्तुशास्त्रानुसार, दोन मोठे प्लॉट्स किंवा मोठ्या घरांच्या मध्यभागी असलेला छोटा प्लॉट घरबांधणीसाठी खरेदी करू नये. परंतु, जर पर्याय नसेल तर दोन्ही घरांपेक्षा अधिक उंच घर बांधून वास्तुदोष निवारणासाठी उपाययोजना कराव्यात.

एखादा प्लॉट तुमच्यासाठी शुभ ठरेल की अशुभ, हे जाणून घेण्यासाठी ज्या व्यक्तीला प्लॉट घ्यायचा आहे, त्याने स्वतःच्या कोपरापासून मधल्या बोटापर्यंत लांबी मोजून घ्यावी आणि संबंधित प्लॉटमध्ये या आकाराच्या लांबीनुसार एक खोल खड्डा खणावा. या खड्ड्यातून निघालेली माती पुन्हा खड्ड्यात भरावी. हा उपाय करताना खड्डा भरण्यासाठी माती कमी पडली तर तो संबंधित प्लॉट तुमच्यासाठी अशुभ समजावा. माती शिल्लक राहिली नाही तर सम आणि माती शिल्लक राहिली तर प्लॉट शुभ समजावा.

Vastu Shastra : घरात कायम ठेवावी ही एक वस्तू, पैशांची चणचण कधी भासणार नाही

घरबांधणीसाठी निवडलेला प्लॉट शुभ आहे की अशुभ हे पाहण्यासाठी सूर्यास्तावेळी प्लॉटवर जावं. त्यानंतर कोपरापासून ते मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजून घ्यावी. त्यानुसार जमिनीवर एक खड्डा खणावा. खड्डा पूर्ण भरेल इतकं पाणी (Water) त्यात ओतावं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्लॉटवर जाऊन तो खड्डा पाहावा. त्यात जर पाणी शिल्लक असेल, तर ती जमीन शुभ समजावी. पाणी नसेल परंतु खड्ड्यात ओलावा असेल तर सम समजावं आणि खड्ड्यातलं पाणी पूर्णतः शोषलं गेलं असेल आणि जमिनीला भेगा पडल्या असतील तर तो प्लॉट अशुभ समजावा.

वास्तुशास्त्रानुसार सर्वाधिक पाणी शोषणाऱ्या प्लॉटची घरबांधणीसाठी बिल्कुल निवड करू नये. असे प्लॉट घरासाठी निषिद्ध मानले गेले आहेत. अशा प्लॉटवर घर बांधल्यास घरात अस्थिरता आणि अनिश्चितता राहते.

Vastu tips : घरात मुंग्याची रांग लागली आहे.... यातून वास्तू देत असते विशिष्ट संकेत

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी घेत नाही आणि कुठल्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही.

First published:

Tags: Home Loan