दिल्ली, 17 नोव्हेंबर: भरपूर पैसा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैसा मिळवण्यासाठी लोक हरतऱ्हेनं प्रयत्न करत असतात. व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक, बचत या मार्गातून भरपूर पैसा (Money) मिळावा यासाठी लोक प्रयत्नशील असतात. परंतु, कठोर मेहनत आणि भरपूर प्रयत्न करूनही एक तर अपेक्षित प्रमाणात पैसा मिळत नाही किंवा पैसा मिळाला तरी तो टिकत नाही, अशी समस्या वारंवार ऐकायला मिळते. ही समस्या लवकरात लवकर सुटावी म्हणून काही जण आध्यात्मिक मार्गाने जातात. काही जण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्रतज्ज्ञाचा सल्लादेखील घेतात. वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Shastra) ज्या घरात आपण राहतो, तेथे काही नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रात घरासंबंधी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख मिळतो. घराची दिशा, घरातल्या वस्तूंची दिशेनुसार मांडणी याविषयीदेखील वास्तुशास्त्रात माहिती मिळते. घरात वास्तुदोष असल्यास अनेक प्रकारे आर्थिक समस्यांचा (Financial Crisis) सामना करावा लागतो; मात्र हा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपायही सांगितले गेले आहेत. याविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. Ravana first Aviator: रावणाच्या लंकेत होती एअरपोर्ट्स? श्रीलंका करतेय संशोधन घरबांधणीनंतर त्यात सकारात्मक (Positive) आणि नकारात्मक (Negative) अशा दोन्ही प्रकारे ऊर्जा (Energy) निर्माण होत असते. सकारात्मक ऊर्जेमुळे जीवन समाधानी होतं, तर नकारात्मक ऊर्जेमुळं जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. घरात वास्तुदोष असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. अपयश, आर्थिक संकटं, आजारपण आदी समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी किंवा दिशेला ठेवाव्यात याविषयीची माहिती वास्तुशास्त्रातून मिळते. एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? उत्तर ऐकून तुम्हालाही घाम फुटेल घरात ईशान्य दिशेला नद्या किंवा धबधब्यांचं चित्र लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. नैर्ऋत्य दिशेला असलेल्या खोलीत देवघर कदापि नसावं. वास्तुशास्त्रानुसार घरात लहान मुलांचा हसरा फोटो लावणं शुभ मानलं जातं. घरात लहान मुलांचा हसरा फोटो लावल्यास घरात सातत्यानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूर्व आणि उत्तर दिशेला लहान मुलांचा फोटो लावणं शुभ मानलं जातं. जीवनात कठोर परिश्रम करूनही आर्थिक तंगी जाणवत असेल, तर घरामध्ये लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो अवश्य लावावा. धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा (North) महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे हा फोटो उत्तर दिशेला लावावा. या फोटोमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाढते. या` 3 राशीच्या व्यक्तींपासून राहायला हवं सावध; कधीही देऊ शकतात दगा घरातल्या भितींवर सुंदर छायाचित्रं लावावीत. यामुळे घर आकर्षक तर दिसतंच; त्याबरोबर धनवृद्धी होते, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात दक्षिण (South) आणि पूर्व (East) दिशेच्या भिंतीवर निसर्गाशी निगडित फोटो लावल्यास निश्चित फायदा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.