मुंबई, 13 फेब्रुवारी: सध्या व्हॅलेंटाइन्स वीक (Valentine’s Week 2022) सुरू आहे. दरम्यान या आठवड्यात विविध डेज साजरे केले जातात. व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी किस डे (Kiss Day 2022) साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन वीकमधील एक महत्त्वाचा रोमँटिक दिवस म्हणून किस डे ची ओळख आहे. पार्टनरला किस करण्यातून आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. Kisses हे कपल्समधील compassion दाखवतात. दरम्यान किस करण्याचे देखील प्रकार आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आणि या प्रत्येक प्रकारातून वेगळा अर्थ सांगितला जातो. गालावर, ओठांवर, कपाळावर किस करण्याचा वेगवेगळा अर्थ आहे. जाणून घ्या काय आहे विविध प्रकारच्या Kisses चा अर्थ. गालावर Kiss करण्यामागचा अर्थ- प्रेमाची भावना व्यक्त करण्याबरोबरच सहकार्य आणि परिपूर्णतेची भावना गालावर Kiss केल्याने व्यक्त होते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर Kiss केलं जातं. कपल्स व्यतिरिक्त मैत्रीच्या आणि जिव्हाळ्याच्या भावनेने देखील गालावर किस केले जाते.
**ओठांवर kiss करण्यामागचा अर्थ-**या किसमधून उत्कटता दिसून येते. याप्रकारचा किस सर्वात स्पेशल मानला जातो. कपाळावर kiss करण्य़ामागचा अर्थ- प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दर्शवण्यासाठी कपाळावर kiss केलं जातं. काही वेळा नात्यामधील भावनिक क्षणांवेळी कपाळावर Kiss केलं जातं.
मानेवर kiss करण्य़ामागचा अर्थ- शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर Kiss केलं जातं. कानांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी कानांवर किस केलं जातं. पण या किसचा प्रभाव पूर्णपणे किस करणाऱ्यांच्या हेतूवर अवलंबून असतो. हातांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- हातांवर Kiss करणं विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. फ्लाइंग kiss करण्यामागचा अर्थ- अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी किंवा गुड- बाय म्हणताना फ्लाइंग किस करण्यात येतं.