JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / #HumanStory: लँट्रिन साफ केल्याबद्दल मिळायच्या दोन शिळ्या भाकरी आणि महिन्याचे 5 रुपये

#HumanStory: लँट्रिन साफ केल्याबद्दल मिळायच्या दोन शिळ्या भाकरी आणि महिन्याचे 5 रुपये

मोठ्या मुलाला उत्साहाने शाळेत पाठवलं. शाळेतही त्याला सगळ्यात मागे बसवण्यात आलं. त्याच्याशी इतर मुलं खेळत नसत. त्याला कुणी काही विचारतही नसे. फक्त एकाच कामासाठी त्याला बोलावलं जाई. ते काम होतं शाळेत झाडू मारण्याचं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शौचालय साफ करणाऱ्या महिलेची कहाणी गुलाबी साडी नेसलेल्या या टिकली लावलेल्या या लाली बाई बामनियाचं आयुष्य नशिबी आलेलं ‘तेच’ काम करण्यात गेलं. ती सांगते - 12 वर्षांची असताना लग्न होऊन आले. दुसऱ्या दिवशी मला कामावर जायचं होतं. काम म्हणजे घरोघरी जाऊन मैला साफ करणे. मी नकार दिला. त्यावर नवरा म्हणाला, ही आमची संपत्ती आहे. मालमत्ता आहे. हे काम करावंच लागेल.   माहेरी मी हे काम कधीच केलं नव्हतं. घरात सगळे मजुरी करून आपलं पोट भरत असत. इथं मात्र वेगळे नियम होते.  घरातील इतर महिलांसोबत पहिल्या दिवशी ‘टरेनिंग’साठी गेले. सगळ्यांच्या हातात एक एक पाटी, जुन्या चादरीचं एक कापड असं साहित्य. पहिल्या घरी पोहोचलो. आम्हाला घरात येण्यासाठी वेगळी वाट होती. तिथून इतर कुणीच येत किंवा जात नव्हतं. मग ट्रेनिंगला सुरुवात झाली. संडासावर राख टाकायची होती. पहिला दिवस असल्यामुळे मला तुलनेनं सोपं काम मिळालं होतं. मी डोळे बंद केले, श्वास रोखून धरला आणि राख टाकायला सुरुवात केली. तेवढ्यात सासू ओरडली, डोळे उघडून टाक. आतापर्यंत डोळेही उघडले होते, श्वासही मोकळा झाला होता आणि तोंडही उघडलं होतं.   त्या दिवशी माझी लवकर सुट्टी झाली. सतत उलट्या येत होत्या. डोकं दुखत होतं. तोंड उघडलं तरी संडासाचा वास येतोय, असं वाटत होतं. डोळे बंद केले की ट्रेनिंगची आठवण यायची. उलटी आणि तापाची गोळी खाऊन पडून राहिले. दुपारी उशिरा जेव्हा सासू आणि नणंद आली, तेव्हा भरपेट मारही खावा लागला.   हे वाचा -  #HumanStory : लोकं समजवायचे, मुलगा गे असेल म्हणून व्हर्जिनिटी टेस्टला नकार देतोय मी हे काम करू शकत नाही, असं त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यावर ते म्हणाले की तुला लग्न करून इथं आणलं आहे. तू करणार नाहीस, तर मग कोण करेल? नवऱ्याने टोमणा मारला. म्हणाला जणू काही राजाच्या घरातून आल्याप्रमाणे नखरे करते आहे. जो सांगितलंय, ते गुपचूप कर.  

संध्याकाळी राग शांत झाल्यावर सासूनं एक उपाय सांगितला. कमी दुर्गंधी येण्याचा उपाय. छोट्याशा भुऱ्या आणि गुलाबी रंगाच्या गोळ्या.  त्या दिवसापासून पुढची 20 वर्षं मी उलट्या रोखण्याचं औषध घेत राहिले. दुसऱ्या दिवशी कामावर गेले. उलटी केली. सफाई केली. त्याच्या पुढच्या दिवशी दोन गोळ्या घेतल्या. मग दरवेळी गोळ्यांचा खुराक वाढतच गेला.   मध्यमवयीन लाली या मंदसौर जिल्ह्यातील धारियाखेडी गावच्या आहेत. गावातील 35 घरं वरच्या जातीतील आहेत. गावातील एका कोपऱ्यात लालीचं घर आहे. अशी वस्ती जिथल्या महिला इतरांच्या घरातील मैला साफ करतात आणि पुरुष इतरांच्या लग्नातील उष्टी ताटं आणि पत्रावळ्या. आपली कहाणी सांगताना लालीला कधीकधी शब्दच सुचत नाहीत. तेवढा ती शांत राहते. मग अचानक बोलत भडाभडा आपलं म्हणणं मांडत राहते. 35 घरांपैकी प्रत्येक बाईच्या वाट्याला 10 घरांचं काम असतं. पूर्ण महिनाभर काम चालतं. एका घरातून एक पाटी उचलल्यानंतर ती टाकायला गावाबाहेर चालत जावं लागतं. तिथून परत आलो की दुसऱ्या घरात जाऊन पाट्या भरायच्या. पहाटे 5 वाजता काम सुरू होतं ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालतं.  

डोक्यावर पाटी घेऊन दररोज 20 किलोमीटर चालावं लागतं. त्यामुळे पाय दुखतात. डोक्यात सतत कळा मारत असतात. डोळे, तोंड आणि गळ्याला सतत दुर्गंधी येत राहते. मान आणि पाठ आखडून जाते.   या सगळ्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळतं? दोन शिळ्या भाकऱ्या आणि महिन्याचे पाच रुपये. भाकऱ्यांसोबत काहीच नाही. भाकऱ्या द्यायचे हेही खूप झालं. काही वेळा काही घरातल्या बायका ताजी भाकरीही ‘टाकायच्या’. हातात वरून अलगद भाकरी टाकण्यात यायची, कारण आमच्या हातांचा त्यांच्या हातांना स्पर्श होऊ नये. सणावाराला ‘बक्षिसी’ही मिळायची.   बक्षिसी म्हणजे खाण्यापिण्याचे चांगले पदार्थ आणि जुने कपडे. तेच अन्न खाऊन आणि तेच कपडे घालून आमचा सण साजरा होत असे.   मग मला ‘परंपरा’ सांभाळण्याची सवय होत गेली. थंडी असो, उन्हाळा असो वा पाऊस सुरू असो. आम्हाला मैला उचलायला तर जावंच लागायचं. मासिक पाळी असो किंवा अगदी आठ महिन्यांची गर्भवती असो, काम तर करावंच लागायचंय.   हे वाचा -  HumanStory: जन्मभर केली लाकूडतोड; सत्तरीत सुरू झालं नवं करिअर, पोहोचल्या इटली, फ्रान्समध्ये पहिल्यांदा गर्भवती असलेल्या महिलेला आपल्याला येणाऱ्या उलट्यांचं नेमकं कारणही समजत नसे. एखाद्या दिवशी वेदनांमुळे ती आली नाही, तर एखाद्या नोकराला आमच्या घरी पाठवलं जायचं. मग घरापुढं उभं राहून तो जोरजोरात ओरडायचा, तुझी बाई आज कामावर आली नाही, म्हणून. तिला पाठव किंवा स्वतःच ये, असं नवऱ्याला म्हणायचा. एवढं वाढलेलं पोट घेऊन काम कसं करतेस, हे कधीच कुणी विचारलं नाही. कुणी कधी आराम करण्याचा सल्ला दिला नाही. आमचे नवरे दारू पिऊन लोळत पडायचे. आमचे सासरे सोडून इतर कुठलाही पुरुष हे काम करत नव्हता. लैट्रिन साफ करता करता एका वर्षातच माझ्या डोक्यावरचे केस गळायला सुरुवात झाली. कितीही काळजी घेतली तरी घाण डोक्यावर पडतच असे. शिवाय वजनही.  

या सगळ्या त्रासाशिवाय लालीला आणखी एक त्रास सुरू झाला. त्वचारोगाचा.  रंग थोडा डार्क होता, पण ती खूप सुंदर होती. नटणं मुरडणंही आवडायचं. इथं येऊन सगळ्या आवडीनिवडी गुंडाळून ठेवाव्या लागल्या. अगोदर हातावर, मग मानेवर आणि मग पूर्ण शरीरावर डाग पडले. खाज सुटायची, जळजळ व्हायची. रात्रभर झोप येत नसे. शिवाय भाकरी देताना लोक शिव्या घालायचे. त्यांचे संडास साफ करता करता माझी ही अवस्था झाली होती आणि त्यांना मात्र वाटायचं की माझ्यामुळे त्यांना हा आजार जडेल.   अगोदर उलटी आणि तापाची गोळी घ्यायचे, आता त्वचारोगाच्या गोळ्या सुरू झाल्या. बोलावण्यासाठी तर आम्हाला एक नाव होतं. भंगी किंवा भंगीण. आमच्या मुलांनाही हीच नावं मिळाली. मोठ्या मुलाला उत्साहाने शाळेत पाठवलं. शाळेतही त्याला सगळ्यात मागे बसवण्यात आलं. त्याच्याशी इतर मुलं खेळत नसत. त्याला कुणी काही विचारतही नसे. फक्त एकाच कामासाठी त्याला बोलावलं जाई. ते काम होतं शाळेत झाडू मारण्याचं. भंगीणीचं पोर आहे, त्याने नाही केलं तर मग कोण हे काम करणार, असा प्रश्नही वरून विचारायचे. त्यानंतर माझं एकही मूल शाळेत गेलं नाही.   हे वाचा -  #HumanStory: मूल होत नसणाऱ्या मित्रासाठी दिले Sperm, ताटातूट होती वेदनादायक 2003 साली एका संस्थेचे लोक आमच्याकडे आले. दुसऱ्यांचा मैला उचलणं ही काही योग्य गोष्ट नाही, हे काम बंद करा, असं ते म्हणाले. त्यांना मी ओरडून सांगायचे, ही आमची परंपरा आहे. आमच्या पूर्वजांनीही हेच केलं आहे. हे काम आम्ही सोडणार नाही. इतर बायकाही माझ्या सुरात सूर मिसळायच्या. हळूहळू मी काम सोडण्याचा फैसला केला. घरच्यांकडून मला मारहाण होऊ लागली.   काम थांबवलं तर लग्न मोडण्याची धमकी पतीनं दिली. मी म्हणाले, मोडलं तर मोडलं. पण हे काम करणार नाही.  मजुरीची कामं शोधली. सोयाबीनची कापणी, शेत साफ करणं, विहीर खोदणं, रस्ते बांधणं अशी कामं शिकले. करणाऱ्याला हजार कामं मिळतात. मलाही मिळायला लागली. पैसे घेऊन घरी जात असल्यामुळे घरच्यांची दादागिरीही कमी झाली. हळू हळू गावातल्या सगळ्या बायकांनी हे काम बंद करून टाकलं.  

10 वर्षं लागली. मी बायकांना सतत समजावून सांगत होते. तिकडे ठाकूरांच्या वस्तीतली माणसं मला धमकवायला यायची. भंगी नसेल तर समाजातला मैला कोण हटवणार?   यावर बराचसा वादविवाद करायचे. परमेश्वरानं सगळ्यांना एकसारखं बनवलं नाही. जर तसं असतं तर तुम्ही भंग्याच्या घरी जन्मला नसता, असं म्हणायचे. अगोदर समजावण्याचा प्रयत्न झाला. मग धमक्या दिल्या. नंतर मारहाणीला सुुरुवात झाली. एकदा घरचे सगळे लग्नाला गेले होते. मी घरीच एकटी असल्याचं बघून घरालाच आग लावली. वाचले तर खोट्या केसमध्ये अडकवून टाकलं. मला वेडी म्हणायचे. मात्र तोपर्यंत आमच्या वस्तीतले बहुतांश लोक माझ्या पाठिशी उभे राहिले होते. 2013 साली सगळ्यांनी काम सोडलं आणि मजुरी करू लागले. आता इज्जत मिळो न मिळो, बेइज्जती तरी नक्कीच होत नव्हती.   हे वाचा -  #HumanStory : भाड्याने रडणाऱ्या ‘रुदाली’ची कहाणी, एका दिवसाला मिळायचे 50 रुपये मैला साफ करण्याचं काम सोडलं,तेव्हा पहिल्यांदाच चप्पल घातली. निळ्या पट्ट्यांची गुलाबी चप्पल. वस्तीवर मैला साफ करायला जाताना चप्पल घालायला मनाई होती. आता चप्पल घालून मजुरीला जाते. संध्याकाळी परत आले की पेनकिलर घेते. हे तेच दुखणं आहे जे इतकी वर्षं परंपरेनं चालत आलं आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या