JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची 'ही' योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल

वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची 'ही' योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल

कलिंगड खाण्याची योग्य वेळ नेमकी कोणती याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च :  उन्हाळ्या चा त्रास कमी करण्यासाठी निसर्गानंच काही फळं या काळात दिलीयत. त्यातलंच एक कलिंगड. जे उन्हाळ्यात मिळतं. कलिंगडात खूप पाणी असतं. आरोग्यासाठी हे फळं उत्तम आहे. याचे अनेक फायदे आहेत. पण कलिंगड खाण्याचाही एक विशिष्ट वेळ असते. वाट्टेल तेव्हा कधीही कलिंगड खाऊन चालत नाही. जर योग्य वेळेत कलिंगड खाल्लं नाही, चुकीच्या वेळेला ते खाल्लं गेलं तर त्याच्या फायद्याऐवजी नुकसानच होईल. कलिंगड हे अल्कली गुणधर्माचं फळ असल्याने, पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते. उन्हाळ्यात घामातून शरीरातील खनिजे निघून जातात. कलिंगड खाल्ल्याने तहान भागते आणि शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते. सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.कलिंगडातल्या पाण्यानं पोट भरतं. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं वजनही वाढत नाही. उन्हाळ्यात कलिंगड खाताय सावधान! आधी हा VIDEO जरूर पाहा पण कलिंगडाचे हे फायदे योग्य वेळेत खाल्ल्याने मिळतील आणि ही वेळ नेमकी कोणती याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ रूपाली महाजन यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे,

रूपाली महाजन यांनी सांगितलं, कलिंगड हे 90 टक्के पाणी असतं. यात शुगरही जास्त असतं. त्यामुळे ते कधी आणि कसं खायचं हेसुद्धा महत्त्वाचं आहे.  कोणतंही फळ असो ते जेवण म्हणूनच खावं. त्यामुळे कोणत्याही इतर खाद्यपदार्थांसोबत ते खाऊ नका. म्हणजे तुम्हाला कलिंगड खायचं असेल तर ते जेवण किंवा नाश्त्यासोबत खाऊ नका. तर कलिंगडच तुम्ही नाश्ता किंवा जेवण म्हणून खाऊ शकता. महाराष्ट्राच्या कलिंगडाची राजस्थानमध्ये चर्चा! नक्की काय आहे कारण पाहा PHOTO कलिंगड खाण्याच्या एक तास आधी आणि एक तास नंतर काहीच खाऊ नये. कारण हे अॅसिडीक असतं. त्यामुळे याच्यासोबत कोणताही विरुद्ध पदार्थ खाल्ले तर मळमळल्यासारखं वाटेल, अॅसिडीटी होऊ शकते. फायद्याऐवजी शरीराला नुकसान होईल. संध्याकाळी 5 नंतर कलिंगड खाऊ नका. कारण आपली पचनपक्रिया मंदावते. यातील शर्करा अॅसिड निर्मिती करू शकतं.

रात्रीच्या वेळेलाही कलिंगड खाऊ नका कारण ते पचायला जड जातं, असंही अनेक डॉक्टर सांगतात. त्यामुळे यापुढे कलिंगड खाताना वेळेचा नियम पाळा. नक्कीच त्याचा फायदा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या