न कापता, न चाखता गोड कलिंगड
कसं ओळखायचं?

कलिंगडाचा आवाज, रंग आणि वजनावरून त्याचा गोडवा ओळखता येतो.

कलिंगडावर हाताने मारा, टप टप मोठा आवाज आला तर ते पिकलेलं.

कलिंगडातून
आवाज कमी येत असेल तर ते कच्चं असू शकतं.

कलिंगडावर वरून जाड, त्यामध्ये पातळ हिरव्या रेषा असतील तर ते गोड.

काळसर किंवा अधिक गडद हिरव्या रंगाचं कलिंगड गोड असतं.

कलिंगडाचा आकारानुसार वजन जास्त असेल तर ते कलिंगड गोड असतं.

कलिंगड आकाराने मोठं पण वजनाने कमी असेल तर ते खरेदी करू नका.

कलिंगडावर हलक्या पिवळ्या रेषा असल्यास ते नैसर्गिकरित्या पिकलेलं.

हा पिवळा भाग
जितका गडद तितकं कलिंगड गोड असतं.

हलका पिवळा किंवा पांढरा रंग असलेलं कलिंगड कच्चं असतं.