प्रतिनिधी, पीयूष पाठक : महाराष्ट्रात सध्या फळ आणि भाज्यांची स्थिती अवकाळी पावसामुळे अत्यंत बिकट आहे. मात्र महाराष्ट्रातील कलिंगडाची सध्या राजस्थानमध्ये तुफान चर्चा होत आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे समजून घेऊया.
2/ 6
कलिंगड विक्रेते हकीमुद्दीन सांगतात की, १५ वर्षांपासून फळ बाजारात काम करत आहेत. त्यांच्या मते उत्तम महाराष्ट्रातील कलिंगड सर्वोत्तम आहेत. त्याची चवही चांगली आहे. ते लवकर खराब होत नाहीत.
3/ 6
महाराष्ट्रातील कलिंगड खायला गोड आणि चविष्ट असतात. एवढंच नाही तर ते दुकानात 15 दिवस ठेवता येतात.
4/ 6
राजस्थानचे कलिंगड इतके गोड नसतात याचं कारण इथे पाण्याची खूप कमतरता आहे.
5/ 6
हकीमुद्दीन सांगतात की कलिंगडाचेही जवळपास 70 प्रकार आहेत. सर्वोत्कृष्ट प्रकार बाहुबली म्हणून ओळखला जातो आणि त्याचा आकार 5 किलो ते 11 किलोपर्यंत आहे. दुसरीकडे राजस्थानचे टरबूज महागले आहे. ते 25 ते 30 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे.
6/ 6
रमजानमध्ये कलिंगड आणखी महाग होणार असल्याचं ते सांगतात. तेव्हा 40 रुपये किलो कलिंगडासाठी भाव येईल. त्यामुळे तुम्ही आता दर कमी आहेत तर कलिंगड खरेदी करू शकता असंही ते म्हणाले.