मुंबई, 08 मार्च : उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. शरीराची पाण्याची तहान भागवण्यासाठी कलिंगड उपयोगी ठरतं. पण हेच कलिंगड जर तुम्ही नीट निवडलं नाही, तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कलिंगड पूर्ण बंदिस्त असलं तरी त्यात भेसळ होते. इंजेक्शनमार्फत त्यात केमिकल सोडलं जातं आणि ते कृत्रिमरित्या पिकवलं जातं. पण आता कलिंगडात केमिकलची भेसळ आहे की नाही हे कसं ओळखायचं, हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊन मळमळ, पातळ शौच, उलट्या होऊ शकतं केमिकलची इंजेक्शन देऊन ते केमिकलने पिकवलेलं तर नाही ना, हे कसं ओळखायचं, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, डॉ. एस. व्ही. हुकिरे यांनी. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Detox Drink : सणासुदीनंतर शरीराला असते डिटॉक्सची गरज, हे 5 ड्रिंक करतील मदत
नैसर्गिक पिकवलेल्या आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या कलिंगडामध्ये खूप फरक असतात. या फरकावरून तुम्हीही नैसर्गिक आणि केमिकलयुक्त कलिंगड ओळखू शकता.
कलिंगडावर कुठे छिद्र, इंजेक्शन टोचल्याच्या खुणा आहेत का तपासा.
कलिंगडावर फिकट पिवळ्या रंगाचे चट्टे असतील तर ते कलिंगड शेतात जमिनीवर नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे.
कलिंगडाचा मोठा तुकडा पाण्यात टाका. पाण्याचा रंग लगेच लाल झाला तर त्यात केमिकल आहे हे समजावं.कलिंगडाचा देठ वाळलेलं आणि गडद काळ्या किंवा तपकिरी रंगाचं असेल तर ते नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे. ते हिरवं असेल तर त्यात भेसळ असू शकतं.
इंजेक्शन दिलेल्या कलिंगडाला नैसर्गिक कलिंगडासारखी गोड चव लागत नाही.
कलिंगड दोन-तीन दिवस कापून नका, जर त्यात रसायन असेल तर ते लवकर खराब होतं, त्यातून पाणी येतं, विचित्र वास येऊ लागतं आणि ते सडतं.
शरीरातील हट्टी कोलेस्टेरॉल बाहेर काढतील 'या' बिया! विज्ञानानेही केले मान्य..
त्यामुळे यापुढे कलिंगड खरेदी करताना या बाबी जरूर तपासून पाहा. जेणेकरून तुमच्या पोटात केमिकलयुक्त नाही तर नैसर्गिक कलिंगड जाईल आणि तुम्हाला त्याचे फायदे मिळतील.
View this post on Instagram
कलिंगडाबाबत तुम्हाला माहिती झालेली ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा. त्यासाठी ही बातमी तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.