JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video

H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video

H3N2 व्हायरसपासून कसा बचाव करावा याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विशेष माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 मार्च : कोरोना व्हायरसच्या आजारातून जग आता सावरत आहे. कोरोना काळाचा देशातील प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसला. कोरोनाची लाट ओसरली असतानाच आता H3N2 हा नवा विषाणू सध्या फोफावत आहे. या विषाणूपासून कसा बचाव करावा याबाबत सध्या पुण्यात असलेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विशेष माहिती दिली आहे. काय आहे H3N2? H3N2 हा विषाणू इन्फ्युएनजा विषाणूंचा उपप्रकार आहे. ह्या विषाणूचा फैलाव लवकर होत आहे. लोकांच्या शिंकेवाटे आणि खोकल्यावाटे या विषाणूचा प्रसार होत आहे. हा हा विषाणू नाक तोंडावाटे फुप्फुसापर्यंत जातो आणि माणसाला संसर्ग होतो. सुरुवातीला सर्दी होणे खोकला येणे अंग दुखणे असे लक्षण दिसतात. आणि हा जो विषाणू संसर्ग अति प्रमाणात शरीरात झाल्यात निमोनिया देखील होतो. निमोनिया हेच या विषाणूचे बलस्थान आहे. अरे देवा! कोरोना, H3N2 नंतर आता 2023 CM; 3 दिवसांनंतर मोठं संकट, NASA चा ALERT 1968 साली या विषाणूची जागतिक साथ आली होती. या साथीमध्ये त्या वेळेमध्ये अनेक लोकांना रुग्णालयात भरती करावे लागले होते एवढी ही गंभीर साथ आहे. सर्वात घातक असा विषाणूचा उपप्रकार आहे. सौंदर्यप्रसाधनं निवडताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम! 2009 मध्ये भारतामध्ये आलेल्या h1n1 म्हणजेच स्वाइन फ्लू या आजाराशी जर एच थ्री एन टू या विषाणूची तुलना केल्यास हा स्वाइन फ्लू पेक्षा देखील अधिक घातक असा विषाणू आहे.ह्या आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांखे त्वरित जाऊन औषध उपचार करून घ्यावे हा आजार जास्त वाढू नये याची काळजी घ्यावी. निमोनियापर्यंत हा आजार जाऊ नये यासाठी जर खोकला वाढल्यास निमोन्याची टेस्ट नक्की करून घ्यावी. यासोबतच गरज वाटल्यास आयसोलेशन देखील करावं,’ असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या