मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे देवा! कोरोना, H3N2 नंतर आता 2023 CM; 3 दिवसांनंतर मोठं संकट, NASA चा ALERT

अरे देवा! कोरोना, H3N2 नंतर आता 2023 CM; 3 दिवसांनंतर मोठं संकट, NASA चा ALERT

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

3 दिवसांनतर मोठं संकट पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे, नासाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

जिनिव्हा, 11 मार्च : कोरोनानंतर आता H3N2 व्हायरसमुळे दहशत निर्माण झाली आहे. हे कमी की काय, त्यात जगावर आणखी एक संकट घोंघावतं आहे. तीन दिवसांनतर हे मोठं संकट पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. नासाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. हे संकट दुसरं तिसरं कोणतं नाही तर एक विशाल एस्टेरॉईड म्हणजे लघुग्रह आहे. ज्याचा आकार दहा मजली इमारतीपेक्षाही मोठ असल्याचं सांगितलं जातं आहे आणि तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे.

14 मार्चला पृथ्वीवर मोठा लघुग्रह धडकण्याची शक्यता आहे. 2023 CM असं या लघुग्रहाचं नाव आहे. जवळपास 180 मीटर म्हणजे 590 फूट आकाराचा हा लघुग्रह असल्याचा सांगितलं जातं आहे. 2 फेब्रुवारीला नासाला हा लघुग्रह दिसला. तेव्हापासून नासाचं यावर लक्ष होतं.  नासाच्या मते, सुमारे 50, 474 किलोमीटर प्रति तास वेगाने तो पृथ्वीच्या दिशेने येतो आहे. आता ज्या वेगाने तो पुढे सरकतो आहे, त्यानुसार अंदाजे तीन दिवसांनंतर तो पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.

काय सांगता! एकाच झाडावर 300 प्रकारचे आंबे; भारतातच आहे हे झाड, पण कुठे ते माहितीये का?

नासाने हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. जर पृथ्वीजवळ आल्यानंतर त्याची चाल जराही बदलली किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अडचण आली तर तो पृथ्वीला धडकेल आणि त्याच्या वेगामुळे पृथ्वीर हाहाकार माजेल.

नासाने आतापर्यंत जितकं या लघुग्रहाला ट्रॅक केलं आहे. त्यानुसार तो 271 दिवसांत एक सोलर ऑर्बिट पूर्ण करतो. अद्याप नासाने याबाबत अधिकृत सूचना दिली नाही पण शक्यता नाकारात येत नाही. नासाच्या एस्टेरॉईड वॉचर्स म्हणाले, ते सलग यावर लक्ष ठेऊन आहेत. सध्या तरी तो पृथ्वीला धडकण्याची शक्यता कमी आहे. पण तरी त्यावर लक्ष ठेवलं जात आहे.

याआधी पृथ्वीजवळून गेले होते लघुग्रह

जानेवारी महिन्यातच एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला होता. 2023 BU हा लघुग्रह 21 जानेवारी रोजी आढळला आणि 27 जानेवारी रोजी सकाळी 12.30 वाजता दक्षिण अमेरिकेतून गेला. हा लघुग्रह पृथ्वीपासून 3500 किलोमीटर अंतरावरून बाहेर आला. याचा अर्थ तो जगातील दूरसंचार उपग्रहांपेक्षा 10 पट जवळ आला होता. यापासून कोणतीही हानी झाली नाही कारण त्याचा आकार 11 फूट ते 28 फूट इतकाच होता आणि 82 फुटांपेक्षा लहान दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळतात.

Mumbai local train मध्ये हेल्मेट घालून प्रवास, प्रवाशानेच सांगितलं कारण; पाहा VIDEO

दरम्यान याधाही पृथ्वीवर असे लघुग्रह आदळले होते. 1908 मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात 60 मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात 10किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासॅार नष्ट झाले होते. 52 हजार वर्षांपूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता.

First published:
top videos

    Tags: Asteroid, Disaster, Earth, Nasa, Viral