मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सौंदर्यप्रसाधनं निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम!

सौंदर्यप्रसाधनं निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम!

सर्व सौंदर्यप्रसाधनं आरोग्याला उपयुक्त नसतात, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबाबत काही काळजी घेणं आवश्यक आहे.

सर्व सौंदर्यप्रसाधनं आरोग्याला उपयुक्त नसतात, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबाबत काही काळजी घेणं आवश्यक आहे.

सर्व सौंदर्यप्रसाधनं आरोग्याला उपयुक्त नसतात, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबाबत काही काळजी घेणं आवश्यक आहे.

  नीलम कराळे, प्रतिनिधी

  पुणे, 11 मार्च :  आपल्या सर्वांना सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यासाठी आपण मार्केटमध्ये मिळणाऱ्या विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. मात्र यामधील सर्व सौंदर्यप्रसाधनं आरोग्याला उपयुक्त नसतात, हे तुम्हाला माहिती आहे का? काही सौंदर्यप्रसाधने घातक देखील असतात. सौंदर्यप्रसाधने निवडताना कोणती काळजी घ्यावी याबाबत आपल्याला पुण्यातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांनी खास टिप्स दिल्या आहेत.

  काय असतो धोका?

  अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये पॅराबेन आणि सल्फेट हे केमिकल्स जास्त करून आढळून येतात. या केमिकलमुळे अनेक साईड इफेक्ट दिसतात.  इमुख्यत्वे हेअर डाय किंवा हेअर कलरच्या सौंदर्यप्रसाधनांच्या मध्ये हे केमिकल आढळून येतात.

  काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये हे केमिकल असतात. केसांना लावायचे शाम्पू कलर्स क्रीम यामध्ये मुख्यत्वे याचा वापर होतो. याची अनेकांना ऍलर्जी देखील होते. पुरळ येणे स्किन लाल होणे केस गळणे अशे याचे साईड इफेक्ट असतात.त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रसाधने निवडताना त्यामध्ये पॅराबेन आणि सल्फेट हे केमिकल नसलेलेच प्रसाधने वापरावीत.

  कोलेस्टेरॉल सहज बाहेर काढेल भोपळ्याचा ज्युस, फक्त 'या'वेळी पिणे आहे आवश्यक!

  मेकअपचे सामान किती दिवस वापरावे?

  अनेक महिला लिपस्टिक, मस्करा, काजळ, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, कन्सिलर, अशा विविध सौंदर्यप्रसाधनाच्याद्वारे आपण चेहऱ्याचा मेकअप करत असतो. मात्र ही प्रसाधने वापरण्याची देखील एक ठराविक मुदत असते. एका वर्षापेक्षाही जास्त कालावधीमध्ये ही सौंदर्यप्रसाधने वापरू नये. कारण एका वर्षानंतर या साधनांचे उपयुक्तता कमी होते. तसेच यामुळे पुढे त्वचेला देखील हानिकारक अशे अपाय होतात.

  यातील सर्व  साधने जास्तीत जास्त एकच वर्ष वापरावीत त्याहून अधिक जर वापर केला तर त्यातील केमिकल रिएक्शन आपल्या चेहऱ्याला होऊ शकते. त्याचा मोठा फटका चेहऱ्याला बसतो.

  वजन अचानक वाढणं नसतं सामान्य, 'या' कॅन्सरची असू शकते सुरुवात

  कोणताही मेकअप केल्यानंतर रात्री तो मेकअप उतरवणे गरजेचे असते. आपली त्वचा ही नेहमीच स्वच्छ ठेवावी.  मेकअपच्या अंशामुळे  चेहऱ्यावर दीर्घाकालीन वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे हा मेकअप उतरवणे आवश्यक आहे.  सध्याच्या घडीला आपली स्किन मॉइश्चराईज करणे गरजेचे असते.  दिवसातून तीन वेळा मॉइश्चरायझिंग क्रीम त्वचेला लावली तर आपली त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर नियमित भरपूर पाणी पिऊनही त्वचेची काळजी घेता येते, असं डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Beauty tips, Health, Lifestyle, Local18, Pune