JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! साधं सर्दी-पडसं म्हणून अंगावर काढलं; महिलेने गमावले आपले दोन्ही पाय

बापरे! साधं सर्दी-पडसं म्हणून अंगावर काढलं; महिलेने गमावले आपले दोन्ही पाय

महिलेने सर्दी-पडशाला गांभीर्याने घेतलं नाही आणि ते तिला चांगलंच महागात पडलं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 12 मार्च : बऱ्याचदा सर्दी-खोकल्याला कित्येक लोक गांभीर्याने घेत नाहीत. साधा सर्दी-खोकला समजून घरीच काहीतरी उपचार केले जातात किंवा एखादं औषध घेऊन आराम केलं जातं. पण सर्दी-खोकल्याला सामान्य समजणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. तिलाही सर्दी-पडसं झालं, ज्याला तिने फार गांभीर्याने घेतलं नाही आणि आता तिने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. सर्दी-पडशामुळे पाय गमावले, याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्दी-पडशाचा पायांशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडले. नेमकं या महिलेसोबत काय घडलं ते पाहुयात.  जुलियाना ब्रँसडेन असं या महिलेचं नाव आहे. 44 वर्षांची जुलियाना एक शिक्षिका आहे. कोरोना महासाथीनंतर तिने पहिल्यांदा आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. पण हे तिच्या आयुष्यातील सेलिब्रेशनचे असे शेवटचे क्षण असतील याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो ‘प्रेग्नंट’; दिसतात अशी लक्षणं नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुलियानमध्ये सर्दी-पडशाची लक्षणं दिसली. साधं समजून तिने त्याला गांभीर्याने घेतलं नाही. घरीच ती आराम करू लागली. एक-दोन दिवसातच तिची तब्येत बिघडली. ती अंथरूणावरून हलूही शकत नव्हती. सुरुवातीला डॉक्टरांनाही सर्दी-ताप वाटला म्हणून त्यांनीही तिला आराम करण्याचा सल्ला दिला.

पण तिची तब्येत खूपच बिघडू लागली. तिची अवस्था पाहून तिच्या नवऱ्याने लगेच अॅम्ब्युलन्स बोलावली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथं तिच्या वैद्यकीय तपासण्या केल्या असता ज्याचं निदान झालं त्यामुळे त्यांना धक्काच बसला. जुलियानाच्या शरीरात सेप्सिस झालं होतं. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 66 दिवस ती आयसीयूमध्ये होती. सेप्सिस शॉकमुळे तिचे हात काळे पडले होते. तिचे दोन्ही पाय कापावा लागले. हाताची काही बोटंही कापण्यात आली. आयला! तरुणाच्या पोटात दारूची बाटली, डॉक्टरही चक्रावले; पण आत गेली तरी कशी? डेली स्टारच्या वृत्तानुसार  डॉक्टर म्हणाले, तिला अॅग्रेसिव्ह न्युमोनिया, इनफ्लुएंझा आणि इनव्हेसिव्ह स्ट्रेप एचा अटॅक आला होता. ज्यामुळे तिचं हसतंखेळतं आनंदी आयुष्य उद्ध्वस्त झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या