मराठी बातम्या /बातम्या /Viral /आयला! तरुणाच्या पोटात दारूची बाटली, डॉक्टरही चक्रावले; पण आत गेली तरी कशी?

आयला! तरुणाच्या पोटात दारूची बाटली, डॉक्टरही चक्रावले; पण आत गेली तरी कशी?

(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

पोटात वेदना होत असलेला हा तरुण डॉक्टरांकडे आल्यानंतर त्याच्या पोटात दारूची बाटली पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

काठमांडू, 11 मार्च : एक बॉटल वोडका तरुणाच्या पोटात गेली आहे. म्हणजे तरुण एक बाटली वोडका प्यायला नाही तर अख्खी बाटलीच त्याच्या पोटात सापडली आहे. तरुणाच्या पोटात दारूची अख्खी बाटली पाहून डॉक्टरही चक्रावले. ही बाटली त्याच्या पोटात गेली तरी कशी याचा तपास आता पोलीस करत आहेत. नेपाळमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.

26 वर्षांचा तरुण पोटात वेदना होत असल्याने डॉक्टरांकडे आला. त्याचे वैद्यकीय रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या पोटात दुसरं तिसरं काही नाही तर दारूची बाटली होती. नूरसाद मंसुरी असं या तरुणाचं नाव आहे. रौतहट जिल्ह्यातील गुजारा नगरपालिकेतील तो रहिवाशी आहे.

दारूची इन्फिनिटी बाटली अनेकांना वाटते हवीहवीशी; पण ही बनवतात कशी माहिती आहे का?

त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सर्जरी करून ती बाटली बाहेर काढण्यात आली आहे. अडीच तास हे ऑपरेशन चाललं.

द हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार  एका डॉक्टराने सांगितलं की, बाटलीमुळे त्याची आतडी फुटली होती, त्यांना सूज येत होती. पण आता त्याला काही धोका नाही.

त्याच्या मित्रांनी त्याला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर प्रायव्हेट पार्टमधून ही बाटली त्याच्या शरीरात टाकली, असा अंदाज वर्तवला जातो आहे. मित्रासोबत असा नको तो खेळ करणाऱ्या आरोपी मित्रांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस म्हणाले, नूरसादच्या मित्रांनी त्याला दारू पाजली आणि पार्श्वभागातून पोटात ही बाटली टाकली असावी. या प्रकरणी समीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास करत आहोत. त्याच नूरसादच्या काही मित्रांचीही चौकशी केली जाते आहे. नूरसादचे काही मित्र फरार आहेत आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.

पोटात स्टिलचा ग्लास

याआधी बिहारमध्येही अशीच एक घटना घडली होती. एका तरुणाच्या पोटात स्टिलचा ग्लास होता. नशेत असलेल्या 22 वर्षांच्या तरुणाला तीव्र पोटदुखी आणि शौचावाटे रक्तस्रावाचा त्रास जाणवत होता. आजाराचं गांभीर्य लक्षात घेत त्याला तात्काळ पाटण्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या पोटात 14 सेमी (5.5 इंच) लांबीचा स्टीलचा ग्लास अडकल्याचं दिसून आलं.

दारू पिऊन टल्ली झाला बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडने जे केलं ते पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटं

हा ग्लास शरीरात जाऊन अडकल्याने त्याच्या गुदद्वारातून रक्तस्राव होत होता. नुकतीच या तरुणावर कोलोस्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करण्यात आली. हा तरुण नशेत असताना त्याच्या शरीरात हा ग्लास गेला असावा, त्यामुळे त्याला ही गोष्ट स्पष्टपणे आठवत नसावी, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Alcohol, Lifestyle, Surgery, Viral