जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो 'प्रेग्नंट'; दिसतात अशी लक्षणं

तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो 'प्रेग्नंट'; दिसतात अशी लक्षणं

पत्नीसोबत पतीमध्येही दिसतात प्रेग्न्सीची लक्षणं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

पत्नीसोबत पतीमध्येही दिसतात प्रेग्न्सीची लक्षणं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

पत्नी प्रेग्नंट असताना पतीमध्येही प्रेग्नन्सीची लक्षणं दिसतात पण अनेकदा ते समजतही नाही.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च :   प्रेग्नन्सी  म्हटलं की सामान्यपणे महिलाच समोर येतात. पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादी महिला प्रेग्नंट होते तेव्हा तिच्यासोबत तिचा नवराही प्रेग्नंट होतो. तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण खरं आहे. बायकोच्या प्रेग्नन्सीच्या कालावधी नवऱ्यामध्येही प्रेग्नन्सीची लक्षणं दिसतात. आता बायकोसोबत नवरा कसा काय प्रेग्नंट होऊ शकतो आणि त्याच्यातील प्रेग्न्सीची लक्षणं कोणती ते पाहुया. पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांनंतर पत्नी प्रेग्नंट होते. पण याशिवाय त्या नवरा-बायकोत या प्रेग्नन्सीचं आणखी एक कनेक्शन असतं, जे अनेकांना माहिती नाही. सर्वांना महिला प्रेग्नंट असल्याचं दिसतं, तिच्यातील प्रेग्नन्सीची लक्षणं दिसतात. पण प्रत्यक्षात तिच्या जोडीदारातही प्रेग्न्सीची लक्षणं दिसू लागतात. आता पती-पत्नीतील प्रेग्नन्सीच्या या अजब गजब कनेक्शनबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. Shocking! एक वर्षाची चिमुकली ‘प्रेग्नंट’; पोटाऐवजी डोक्यात वाढत होतं मूल आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यांनी सविस्तर सांगितलं आहे. “बाबा होणार असलेल्या पुरुषांनो तुमची पत्नी प्रेग्नंट असताना तिच्यासोबत तुमचंही वजन वाढतं आहे का? तुम्हालाही कधीकधी अस्वस्थ, मळमळल्यासारखं वाटतं का?, तुमच्या शरीरातून गॅस उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं आहे का? मग जोडीदारासोबत तुमच्यातही प्रेग्नन्सीची लक्षणं दिसत आहे. ही सिम्पेथेटिक प्रेग्नन्सीची लक्षणं आहेत”, असं सिमरत म्हणाल्या.

News18लोकमत
News18लोकमत

“तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण असंच खरंच होतं आणि ते तुमच्या लक्षातही येत नाही. बायको प्रेग्नंट असल्यावर नवऱ्यालाही तिच्यासारखं काहीरी खाण्याचे डोहाळे लागतात. याशिवाय अँझायटी, डिप्रेशन, झोपण्यात समस्या, थकवा अशी मानसिक लक्षणं दिसतात. याशिवाय अशी बरीच लक्षणं आहेत पण प्रत्येक व्यक्तीमध्ये ही लक्षणं वेगळी असू शकता”, असं सिमरत यांनी सांगितलं. पुरुषांनी बायकोच्या प्रेग्न्सीच्या कालावधीत आपल्या वजनावर नियंत्रण कसं ठेवायचं? भरपूर पाणी प्या आणि कॅलरीजयुक्त पाणी कमी प्या. म्हणजे घराबाहेर पडताना घरातून पाणी घेऊन जा. बाहेरची शुगरी ड्रिंक टाळा. पाण्याचं प्रमाण वाढल्याने शरीरातील विषारी घटक निघून जातील. OMG! 9 महिने नव्हे तब्बल 9 वर्षे ‘प्रेग्नंट’ होती महिला; पोटातील बाळाला पाहून डॉक्टरही हैराण चालणंही गरजेचं आहे. या काळात काही ना काहीतरी शारीरिक क्रिया करत राहा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही काही एक्सरसाइझ करू शकता. यामुळे तुमचं नातंही अधिक घट्ट होईलय

जाहिरात

पोषक आहार घ्या. कमीत कमी वेळेत तयार होणारे, सोपे पदार्थ जसं की फास्ट फूड खाणं टाळा. ज्या आहारात सर्व पोषक घटक असतील असा आहार घ्या. मग तुम्ही घरी बनवलेले पदार्थ खा किंवा रेस्टॉरंटमध्ये. सर्व पोषक घटक मिळतील अशाच पदार्थांचं सेवन करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात