JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Wardha News: आलू बोंडा खाल्लात काय? पाहा वर्ध्यातील फेमस रेसिपी बनते कशी?

Wardha News: आलू बोंडा खाल्लात काय? पाहा वर्ध्यातील फेमस रेसिपी बनते कशी?

वर्ध्यातील आलू-बोंडा हा चांगलाच फेमस आहे. जवळपासच्या गावातूनही इथं हा पदार्थ खाण्यासाठी चांगलीच गर्दी असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 27 जून: बटाटा वडा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. वर्ध्यात या बटाटा वड्याला ‘आलू बोंडा’ असं देखील म्हणतात. त्यात वर्ध्यातील भोगेच्या आलुबोंड्याची चवच न्यारी असून हा बटाटा वडा खवय्यांना भुरळ घालतोय. तब्बल 50 ते 60 वर्षांपूर्वी केशवराव सिताराम भोगे यांनी संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात केली होती. आता भोगेचा आलू बोंडा आणि मूंग वडा या नावाने पदार्थ प्रसिद्ध आहेत. वर्धा शहरातच नाही तर आजूबाजूच्या गावातून देखील येथील बटाटा वडा खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी दिसून येते. 3 तासांत स्टॉक फिनिश भोगे यांचा हा बटाटा वडा आणि मूग वडा सायंकाळीच विक्री केला जातो. सायंकाळी पाच ते रात्री आठ - साडेआठ वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्ण स्टॉक संपतो. दररोज 15 ते 20 किलोचे बटाटे वडे तीन तासातच वर्धेकर फस्त करतात. या व्यवसायातून भोगे यांना दिवसाला पाच ते सहा हजार रुपयांची मिळकतही होते. सध्या केशवराव यांचे नातू अंकुश भोगे हा व्यवसाय सांभाळत आहेत.

दुकानाला एकही बॅनर नाही खाण्याचा प्रसिद्ध पदार्थाचे दुकान म्हटल्यावर बॅनरबाजी आलीच. मात्र या प्रसिद्ध आलू बोंडाच्या दुकानाचे एकही बॅनर नाही. घरूनच वर्षानुवर्ष आलू बोंडे आणि मूंग वडे विक्री होतात. पाच वाजता पासूनच बटाटे वडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ दिसून येते. 2 रुपयांपासून झाली सुरवात जेव्हा या व्यवसायाची सुरुवात झाली तेव्हा अवघे 2 रुपये एका प्लेटची किंमत होती. आता 25 रुपये प्लेट इतकी किंमत आहे. ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली ते केशवराव भोगे यांचे वय आता 93 वर्ष असून ते बीकॉम ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला अनेक वर्षांपासून वर्धेकरच नाही तर बाहेर जिल्ह्यातील नागरिकही पसंती देत आहेत. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video 8-9 जणांना दिला रोजगार दुपारी दोन पासून बटाटा वडा आणि मुंग वडा बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाते. मागील काही वर्षांपासून बटाटा वड्याची मागणी दिवसेंदिवस वाढत गेल्याने मनुष्यबळही वाढवावे लागले. आता या व्यवसायावर 8 ते 9 जणांना रोजगारही प्राप्त झाला आहे. या आलू बोंडाची चव कायम ठेवण्याचा प्रयत्न भोगे कुटुंबीय करत आहे. वर्धाच्या ठाकरे मार्केट चौकाजवळच भोगे यांच्या घरीच दुकान असून या बटाटा वडा आणि मुंग वड्याला मोठी मागणी आहे. पावसाळ्यात जास्त मागणी पावसाळ्यात पाऊस पडत असताना गरमागरम बटाटे वडे किंवा भजी खाणे अनेक जण पसंत करतात. त्यामुळे भोगे यांच्या बटाटेवड्याला पावसाळ्यात मागणी वाढलेली दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या