JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सुकी मासळी येते कुठून? किती आहेत प्रकार? चला तर मग या 100 वर्ष जुन्या बाजारात, Video

सुकी मासळी येते कुठून? किती आहेत प्रकार? चला तर मग या 100 वर्ष जुन्या बाजारात, Video

मुंबईकरांच्या ताटात सुकी मासळी कुठून येते? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान-आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 1 मे : महाराष्ट्राला 720 किलो मीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेकांच्या रोजच्या जेवणात समुद्रातून मिळणाऱ्या माशांचा समावेश असतो. पावसाळ्याचे चार महिने बोटी समुद्रात जात नाहीत. यावेळी मत्स्याहार प्रेमीचे जिभेचे चोचले सुक्या मासळीद्वारे पुरवले जातात. पापड, लोणची या पदार्थांची साठवणूक आपण जशी करतो त्याच पद्धतीनं सुकी मासळी विकत घेऊन ती निवडण्याची तसंच त्याची व्यवस्थित जपणूक करण्याचे काम केले जाते ठाणे जिल्ह्यातील 100 वर्ष जुन्या मार्केटमधून ही सुकी मासळी येते. या मार्केटची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. सुकी मासळी कुठून येते? कल्याण जवळील सोनाळे, कोनगाव अशा भागात वर्षानुवर्षे सुक्या मासळीचा बाजार भरतो. या बाजारात दिव दमण, अर्नाळा, रायगड, जाफराबाद, गुजरात अशा विविध ठिकाणाहून मासे विक्रीसाठी आणले जातात. दीव दमण, जाफराबाद, अर्नाळा आणि रायगड जिल्ह्यातील उरण, रेवस, अलिबाग येथे बंदर असल्याने या टापूत मोठ्या प्रमाणत मासे विक्रीची उलाढाल होते.

‘अनेक वेळा ओल्या मासळीला भाव मिळत नाही. पण हीच मासळी सुकवली की त्या मासळीला अधिक भाव मिळतो. त्यामुळे मार्केटमध्ये भाव पडले की हे मासे वाळवायला खळ्यावर नेले जातात. त्यानंतर त्यांना मीठ लावून वाळवून त्यांची देखरेख केली जाते. हे सर्व भरपूर मेहनतीचं काम आहे. त्यामुळे भाव देखील अधिक वाढतो,’ अशी माहिती विक्रेते जयविंद कोळी यांनी दिली आहे. कुठे द्राक्षाच्या मळ्यात तर कुठे चुलीवरची झणझणीत मिसळ, ही आहेत नाशिकमधील टॉप 6 ठिकाणं या बाजारात   बोंबील, वाकट्या, सोडे, दांडी, जवळा, पापलेट, सुरमई  या  माशांना अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेते सलाम भाई यांनी दिली. सध्या चांगल्या सोड्याचे भाव 2000 रुपये किलो आहेत. तर दांडी, सुके बोंबील यांचे 400 ते 500 रुपये किलो आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे भाव 5 ते 10 टक्क्यांनी वधारले असल्याची माहिती या विक्रेत्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या