खवय्यांचं माहेरघर म्हणून नाशिक शहर प्रसिद्ध आहे. येथील मिसळ जगभर प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये आल्यावर अनेकजण मिसळ नक्की खातात. नाशिक शहरातील सर्वात फेमस मिसळ कोणत्या आहेत ते पाहूया
ग्रेप एम्बसी मिसळ : निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत या मिसळचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. त्यामुळे खवय्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावतात. कुठे खाणार? - सुयोजित पुलाजवळ, गंगापूर, रोड, मखमलाबाद, नाशिक
साधना मिसळ : अस्सल चुलीवरची झणझणीत लाल काळया रस्साची ही मिसळ आहे. येथील जम्बो मिसळ खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : हरदेव बाग, गंगापूर - सातपूर लिंक रोड, सोमेश्वर जवळ, बारदान फाटा, नाशिक
सिताबाईची मिसळ : या मिसळीला 100 वर्षांची परंपरा आहे. चुलीवरची झणझणीत मिसळीसोबत मिळणारा लाल रस्सा येथील आकर्षण आहे. कुठे खाणार ? वृंदावन कॉलनी, नाईकवाडी पुरा, कोकणीपुरा, नाशिक, 422001
श्री सोमनाथ मिसळ : येथील मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं घरगुती मसाले वापरले जातात. ही झणझणीत जम्बो मिसळ खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : दुकान क्रमांक 1, महामार्ग बस स्टॉप, मुंबई नाका, नाशिक - 422001 (मायलन सर्कल जवळ)
हॉटेल रिलॅक्स कॉर्नर : भिमाबाईंची ही फेमस मिसळ आहे.विशेष म्हणजे इथे मिसळचा आस्वाद घेताना पुस्तकांची देखील मेजवानी मिळते. विविध प्रकारची पुस्तक या ठिकाणी मिसळीचा आस्वाद घेताना वाचायला मिळतात. कुठे खाणार? : नाशिक शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हॉटेल रिलॅक्स कॉर्नर आहे
पेरुची बाग मिसळ : निसर्गरम्य वातावरणात पेरूच्या बागेत तुम्हाला मिसळचा आस्वाद घ्यायला मिळतो. ही मिसळ खाणारा व्यक्ती इथं पुन्हा एकदा नक्की येतो. कुठे खाणार ? मुंगसरे फाटा मखमलाबाद गिरनारे, महामार्ग, नाशिक