JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केवळ 2 महिने येतो आणि थंडगार करतो; 'या' नारळाविषयी ऐकलंय?

केवळ 2 महिने येतो आणि थंडगार करतो; 'या' नारळाविषयी ऐकलंय?

कच्च्या नारळाचा वापर स्वयंपाकघरात वाटण बनवण्यासाठी केला जातो. मात्र राजस्थानमध्ये लोक चक्क थंडगार वाटावं म्हणून या नारळावर तुटून पडतात.

जाहिरात

मऊ शहाळं खाण्यासाठी, थंड पाणी पिण्यासाठी या दुकानांसमोर गर्दी पाहायला मिळते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 8 जून : केवळ उन्हाळ्यातच नाही, तर बाराही महिने अति उकाडा जाणवला की आपण लगेच नारळपाणी पितो. परंतु थंडावा मिळवण्यासाठी कच्चा नारळ फोडून त्यातलं पाणी प्यायल्याचं आपण ऐकलंय का? त्यातलं पाणी आपण पितोच परंतु थंडगार वाटावं म्हणून नाही. तर त्या नारळाचा वापर स्वयंपाकघरात वाटण बनवण्यासाठी केला जातो. मात्र राजस्थानमध्ये लोक चक्क थंडगार वाटावं म्हणून कच्च्या नारळावर तुटून पडतात. खरंतर आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या नारळापेक्षा हा नारळ जरा वेगळा असतो. तो बाजारात केवळ दोन महिने दिसतो. राजस्थानच्या करौली जिल्ह्यात त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. चेन्नई आणि तामिळनाडूमधून त्याची आयात केली जाते.

केवळ दोन महिने मिळणारा हा नारळ नागरिक चवीने खातात. त्याच्या आतलं पाणी अतिशय गोड असतं, शिवाय खोबरंही स्वादिष्ट लागतं. त्याचे तुकडे विकले जातात. विशेष म्हणजे या नारळामुळे दोन महिने का होईना परंतु जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार मिळतो. Shahid kapoor: ‘तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…’ शाहिदने सांगितला ऐश्वर्या राय सोबत काम करण्याचा तो अनुभव मऊ शहाळं खाण्यासाठी, थंड पाणी पिण्यासाठी या नारळाच्या दुकानांसमोर लहान मुलं, तरुणमंडळी आणि वृद्धांच्या रांगा पाहायला मिळतात. खास चेन्नई आणि तामिळनाडूहून मागवले जाणारे हे नारळ नारळी पौर्णिमेपर्यंत उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिक त्यांचा आस्वाद मोठ्या प्रमाणावर घेतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या