मुंबई, 08 जून : शाहिद कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहिद चित्रपटांसोबतच वेबसिरीज मध्ये देखील झळकत आहे. त्याचा ब्लडी डॅडी हा चित्रपट आता याच आठवड्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिदचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. आज शाहिद बॉलिवूडमध्ये यशस्वी झाला असला तरी त्याने नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. शाहिदने एके काळी चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे. खूप संघर्षांनंतर त्याने ‘इश्क विश्क’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. ऐश्वर्या रायच्या एका सुपरहिट चित्रपटातून त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं होतं. त्याच्यासाठी हा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे. सध्या शाहिद ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यान शाहिदने अनेक खुलासे केले आहेत. अलीकडेच शाहिदने ऐश्वर्या रायसोबत तालच्या शूटिंगबाबत खुलासा केला आहे. शाहिदने ऐश्वर्यासोबत ‘कहीं आग लग जाए’ या गाण्यावर डान्स केला होता. यासंबंधीचा किस्सा त्याने सांगितला आहे.
शाहिद कपूरने 2003 साली इश्क विश्क या चित्रपटातून पदार्पण केले होते. शाहिदने अलीकडेच एका मुलाखतीत ऐश्वर्या रायसोबत ‘कहीं आग लग जाए’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना काय घडले याचा खुलासा केला. हा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याचं त्याने म्हटलं आहे. Ramayana Movie: नितेश तिवारींच्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट; ‘हे’ स्टार कपल साकारणार राम अन् सीतेची भूमिका शाहिदने सांगितले की, ‘जेव्हा तो हे गाणे शूट करण्यासाठी जात होता तेव्हा त्याचा अपघात झाला. जेव्हा तो सेटवर पोहोचला तेव्हा तिथली परिस्थिती खूपच वाईट होती. कारण या शूटिंगमध्ये योग्य शॉट मिळत नव्हता. पण जेव्हा त्याला एक चांगला शॉट मिळाला तेव्हा शाहिदच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शाहिद म्हणाला, ‘हे कोणालाच माहीत नाही, पण त्या दिवशी माझा अपघात झाला होता. मी दुचाकीवरून जात होतो आणि जाताना त्यावरून पडलो. मला आठवतं की मी सेटवर पोहोचलो तेव्हा खूप घाबरलो होतो.’ शाहिद पुढे म्हणाला, ‘मी बाईकवरून पडलो आणि मला समजले नाही की माझे काय झाले? तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला आणि वाईट दिवस म्हणून लक्षात राहील. शाहरुख आणि माधुरी दीक्षितचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट तालच्या आधी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही शाहिद बॅकग्राउंड डान्सरच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या शूटिंगबाबतही अभिनेता म्हणाला की ‘तेव्हा तो खूप घाबरला होता.’ वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूर नुकताच फर्जी या वेब सीरिजमध्ये दिसला होता. फर्गीच्या आधी शाहिदचा जर्सी हा चित्रपट आला होता ज्यामध्ये तो मृणाल ठाकूरसोबत दिसला होता. आणि आता उद्या (९ जून) शाहिदचा ब्लडी डॅडी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.