JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरे देवा! आता Mystery brain disease चं संकट; थेट मेंदूवरच हल्ला करत स्मरणशक्ती करतोय गायब

अरे देवा! आता Mystery brain disease चं संकट; थेट मेंदूवरच हल्ला करत स्मरणशक्ती करतोय गायब

Mysterious brain disease : मेंदूवर परिणाम करणाऱ्या या अज्ञात आजाराचे तब्बल 50 रुग्ण सापडले आहेत.

जाहिरात

मेंदूच्या पेशींचं विषाणूमुळे झालेलं नुकसान रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम करू शकतं आणि गंभीर संसर्गाचा धोका वाढू शकतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उटावा, 19 जानेवारी :  कोरोनाव्हायरसची दहशत अद्यापही कायम आहे. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट थैमान घालत आहेत. अशात आता आणखी एका अज्ञात आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. हा आजार थेट मेंदूवरच हल्ला करतो आहे (Mystery brain disease). त्याचा भयंकर परिणाम म्हणजे या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचं स्वतःच्या शरीरावर नियंत्रण राहणत नाही आणि धक्कादायक म्हणजे त्यांची स्मरणशक्तीही गायब होते आहे. कॅनडाच्या (Canada) न्यू ब्रन्सविकमध्ये (New Brunswick) राहणारी 33 वर्षांची टेरिलिन पोरेले (Terriline Porelle) दीड वर्षांपूर्वी तिच्या पायात अचानक काहीतरी रुतल्यासारखं वाटलं आणि वेदना होऊ लागल्या. हळूहळू तिच्या वेदना हातापायात पसरल्या आणि तिच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ लागला. हायकिंगची आवड असणाऱ्या टेरेलिनला दररोजचं काम करतानाही तिला थकवा जाणवू लागला. इतकंच नव्हे तर तिचं शरीर आणि मेंदू यांच्यात ताळमेळ राहिला नाही. चालताना तिचा तोल ढासळायच कधी ती भिंतीला, कधी फर्निचरला धडकायची. घरातील छोट्या छोट्या गोष्टीही ती विसरू लागली. हे वाचा -  सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केली पाठदुखी; मेडिकल रिपोर्ट पाहताच हादरली टेरिलिनने डॉक्टरांकडून आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. तिला कोणताच ताणतणाव, डिप्रेशन नव्हतं. पण आपल्या या समस्येचं कारण तिला काही समजलं नाही.  टेरिलिन पोरेले एका अज्ञात आजाराच्या विळख्यात सापडली आहे. मिररच्या रिपोर्टनुसार  टेरेलिनने याबाबत माहिती मिळवली तेव्हा या आजाराचा सामना करणारे आपण एकटे नाहीत तर बरेच रुग्ण आहेत हे तिला समजलं. तिच्यासारख्या तब्बल 50 लोकांना या आजाराने ग्रासलं आहे.  34 रुग्णांमध्ये टेरेलिनमध्ये जी लक्षणं दिसत होती, तशीच लक्षणं होती. त्यांना मानसिक भ्रम होत होते, त्यांची स्मरणशक्ती गायब होत होती. हे वाचा -  वयाची तिशी ओलांडली तरी महिला अंथरूणात करायची लघवी; धक्कादायक आहे कारण या आजारचं नेमकं नाव, कारण आणि उपचार समजलेले नाहीत. हे लोक अज्ञात मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. आपल्यासोबत नेमकं काय होत आहे, हे त्यांनाही समजत नाही आहे आणि डॉक्टरांकडेही याबाबत कारण आणि उपचार नाहीत. पण आता ते एकमेकांना आपली लक्षणं सांगत आहेत आणि आजाराशी लढण्याची हिंमत देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या