Home /News /lifestyle /

सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केल्या पाठीच्या वेदना; अखेर मेडिकल रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहताच हादरली

सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केल्या पाठीच्या वेदना; अखेर मेडिकल रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहताच हादरली

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

3 महिने ती पाठीच्या वेदनांसाठी पेनकिलर घेत राहिली. वेदना असह्य झाल्यानंतर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली आणि तेव्हा तिला त्यामागील धक्कादायक कारण समजलं.

    जेरूसेलम, 19 नोव्हेंबर : बहुतेक महिलांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास असतो. याला सामान्य समजून काही महिला याकडे दुर्लक्ष करतात. पॅलेस्टाइनमधील (Palestine) एका महिलेनेही तिच्या पाठदुखीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण वेदना असह्य झाल्यानंतर तिने वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर मात्र तिच्या पायाखायलची जमीनच सरकली (Woman Back Pain shocking reason). वेस्ट बँकमध्ये (West Bank) राहणारी अदि ब्लॉय  (Adi Bloy)  तीन महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त होते (3 Months Old Back Pain).तीन महिन्यांपूर्वी ती एका लग्नाला परतली होती. तेव्हापासून तिला वेदना सुरू झाल्या. पेन किलर घेऊन ती आपल्या वेदनांपासून तात्पुरता आराम मिळत होती. पण हळूहळू तिला वेदना असह्य होऊ लागल्या. अखेर ती डॉक्टरांकडे गेली. तिथं वैद्यकीय तपासणीत तिला जे समजलं त्यामुळे तिला धक्काच बसला. हे वाचा - या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! द टाइम्स ऑफ इज्राइलच्या वृत्तानुसार, तीन महिन्यांपूर्वी अदी आपल्या मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. तेव्हापासूनच तिच्या कमरेत वेदना होऊ लागल्या.  कदाचित कमरेतील नस ताणली गेली असावी म्हणून असं होत असा अंदाज तिने बांधला. तिच्या हाताला रक्तही लागलं होतं पण त्याचवेळी तिच्या हाताला छोटी जखम झाली होती, त्यातून रक्त येत असावं असं तिला वाटलं. पण  त्यावेळी तिच्या ड्रेसला पडलेल्या छिद्राकडे तिचं लक्ष गेलं नाही. तिच्या शरीरात एक बुलेट घुसली होती आणि हे तिला माहितीच नव्हतं. तीन महिने पाठदुखीने त्रस्त झाल्यानंतर तिने जेव्हा सीटी स्कॅन केला तेव्हा तिला धक्का बसला. तिच्या कमरेतील हाडांमध्ये बुलेट असल्याचं दिसलं. तिची तात्काळ सर्जरी करण्यात आली. ऑपरेशन करून तिच्या कमरेतील बुलेट बाहेर काढण्यात आली.  5.56 मिमीची ही बुलेट होती. हे वाचा - तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? घेत असाल तर सावधान! डॉक्टरांच्या मते, शरीरात बुलेट घुसूनही अदि जिवंत आहे हा एक चमत्कार आहे. जर ही बुलेट थोडी जरी खाली असती तर तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकला असता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Pain

    पुढील बातम्या