Home /News /lifestyle /

वयाची तिशी ओलांडली तरी महिला अंथरूणात करायची लघवी; धक्कादायक आहे कारण

वयाची तिशी ओलांडली तरी महिला अंथरूणात करायची लघवी; धक्कादायक आहे कारण

अंथरूणात लघवी करण्यामागील नेमकं कारण जेव्हा या महिलेला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

    लंडन, 18 जानेवारी : लहान मुलं किंवा अंथरूणाला खिळलेली आजारी किंवा वयस्कर व्यक्ती अंथरूणात लघवी करते हे आपल्यासाठी नवं नाही. पण एखादी ठणठणीत दिसणारी प्रौढ व्यक्तीही अंथरूणात लघवी करू लागली, तर आश्चर्यच वाटेल. एका महिलेच्या बाबतीत असं होत होतं. वयाची तिशी ओलांडलेली ही महिला दररोज अंथरूणात लघवी करायची (33 year old woman wet bed). यामागील नेमकं कारण जेव्हा तिला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. इंग्लंडच्या नॉर्विकमध्ये राहणारी 43 वर्षांची एना वेकफील्ड (Anna Wakefield) एक आरोग्य आणि सुरक्षा अधिकारी आहे.  2012 साली एना 135 किमीच्या चॅरेटी वॉकवर गेली होती, तेव्हा ती टेन्टमध्ये थांबली होती. सकाळी उठून तिला तिची पँट ओली झाल्याचं जाणवलं. चालून चालून थकल्याने कदाचित रात्री लघवी झाली असावी आणि जागही आली नसावी, असं तिला वाटलं. तिथून घरी परतल्यानंतर तिने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला (Woman dangerous disease make her wet bed). डॉक्टरांनी तिची तपासणी केली. पेल्विक मसल कमजोर झाल्याने ती लघवी रोखू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील 9 महिने तिची परिस्थिती अजूनच बिघडली. दिवसाला ती तीन डायपर वापरायची. पण तरी तिचे कपडे ओले व्हायचे. त्यानंतर 2013 साली तिच्या या समस्येचं नेमकं कारण समजलं. तिला एक गंभीर आजार झाला होता. हे वाचा - सर्दी, व्हायरल तापाची लक्षणं, तरी कोरोना टेस्ट करावी का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा तिला सर्व्हिकल कॅन्सर (Cervical Cancer)  असल्याचं निदान झालं. तिचा कॅन्सर पहिल्या टप्प्यातील होता आणि ती 5 वर्षे जिवंत राहू शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर 6 आठवडे तिच्यावर किमोथेरेपी झाली आणि तिचा ट्युमर लहान झाल्याचं सांगण्यात आलं. यानंतर अंथरूणात लघवी होण्याची समस्याही कमी झाली. 6 महिन्यांनी तिचं स्कॅन करण्यात आलं तेव्हा तिचा कॅन्सर फुफ्फुसापर्यंत पसरल्याचं दिसलं. ती चौथ्या टप्प्यातील कॅन्सरमध्ये पोहोचली होती आणि तिची वाचवण्याची शक्यता फक्त 5 टक्के होती. यानंतर तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. पुन्हा 5 महिने तिला किमो देण्यात आला. ती खूप कमजोर झाली होती. तिचे केस पूर्णपणे गळले होते पण ती खचली नाही. 6 महिन्यांनी जेव्हा तिचं स्कॅन केलं तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. तिचा कॅन्सर नष्ट झाला होता. हे वाचा - काय म्हणावं याला! म्हणे, 'मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी', पैसे देण्याचीही तयारी द सनशी बोलताना एनाने सांगितलं, डॉक्टरांनी जगण्यासाठी दिलेली 5 वर्षांची डेडलाईनही आता संपली आहे. त्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी ती जिवंत आहे. त्यानंतर तिने आपल्या जीवनशैलीत बरेच बदल केले. वजन नियंत्रणात आणलं. आता ती अंथरूणात लघवी करत नाही. ट्युमरमुळे तिच्या मूत्राशयावर दाब येत होता आणि त्यामुळेच तिला अचानक लघवी होत होती. या प्रक्रियेमुळे तिला वंध्यत्व आलं आहे. पण तिला त्याचं दुःख नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या